Video : ज्वेलर्स दुकानातून अज्ञात महिलेने सोन्याचे मंगळसूत्र लांबविले, शहर पोलीसात गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
खामगावच्या मोहन चौक परिसरात असलेल्या सोन्या-चांदीच्या दुकानामध्ये 8 फेब्रुवारी रोजी एक बुरखा घातलेली अज्ञात महिला दुकानात आली. तिने मंगळसूत्र दाखवा असे म्हणून काम करणार्या माणसांनी तिला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र दाखविले. त्यानंतर ते मंगळसूत्र पाहून मला मंगळसूत्र पसंत नाही असे म्हणून निघून गेली.
बुलढाणा : खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका बुरखाधारी महिलेने सोन्याचे मंगळसूत्र (Gold Mangalsutra) चोरल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली आहे. मोहन चौक परिसरात असलेल्या जांगिड यांच्या ज्वेलर्स (Jewelers) दुकानात अज्ञात बुरखाधारी महिलेने सोन्याचे मंगळसूत्र मोठ्या शिताफीने लांबविले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संध्याकाळी दागिने मोजताना दुकान मालकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही चेक केल्याने हा प्रकार लक्षात आला. शहर पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या बुरखाधारी महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. (A woman stole Mangalsutra from a jeweller’s shop in Buldhana)
पोलिसांकडून अज्ञात महिलेचा शोध सुरु
खामगावच्या मोहन चौक परिसरात असलेल्या सोन्या-चांदीच्या दुकानामध्ये 8 फेब्रुवारी रोजी एक बुरखा घातलेली अज्ञात महिला दुकानात आली. तिने मंगळसूत्र दाखवा असे म्हणून काम करणार्या माणसांनी तिला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र दाखविले. त्यानंतर ते मंगळसूत्र पाहून मला मंगळसूत्र पसंत नाही असे म्हणून निघून गेली. मात्र संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास दुकानातील मालाची तपासणी केली असता त्यातील 11.070 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र दिसले नाही. गोल्ड शोरूम मधील सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यामध्ये एक बुरखाधारी महिलेने ट्रे मधील अंदाजे 55 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे दिसले. तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्या बुरखाधारी महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.
परभणीत बँकेच्या बाहेरून चोरट्यांनी पळवली लाखांची रोकड
भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून महापालिकेच्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या खात्यातून काढलेली एक लाख रुपयांची रक्कम दोघा भामट्यांनी मोठ्या शिताफीने लंपास केली. महापालिकेचे कर्मचारी अल्तमश अली मीर यांनी स्टेट बँकेतून एक लाख रुपये काढले. बँकेच्या आवारात आसनावर बसले असताना एका भामट्याने त्यांच्या अंगावर पावडर टाकली. आपल्या अंगावर झाडावरून काही पडले अस सांगितले. काय पडलं हे पडताळत असताना दुसऱ्या भामट्याने त्यांच्याजवळील बॅग घेऊन पोबारा केला. (A woman stole Mangalsutra from a jeweller’s shop in Buldhana)
इतर बातम्या
Mumbai Crime : टकटक गँगच्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई