रानात जळण आणायला गेली होती महिला, काही वेळाने मृतावस्थेत आढळली !

अज्ञात कारणातून कराडमध्ये एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रानात जळण आणायला गेली होती महिला, काही वेळाने मृतावस्थेत आढळली !
कराडमध्ये अज्ञात कारणातून महिलेला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 2:38 PM

कराड / दिनकर थोरात : जंगलात जळण आणायला गेलेल्या महिलेची अज्ञात इसमाने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील वनवासमाची येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. लता चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. लता यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस तपास करत आहेत. तपासाअंती सत्य समोर येईल.

जळण आणायला गेली असता हत्या

लता चव्हाण या मंगळवारी दुपारी जळण आणायला गावाशेजारी जंगलात गेल्या होत्या. त्यांची मुले शेणोली येथे अकलाईदेवी यात्रेला गेली होती. मुले घरी परत आल्यावर त्यांनी आईचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, गावातील काही लोकांनी लता यांना जळण आणायला जाताना पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता लता यांचा निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला.

आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची छापेमारी सुरु

प्राथमिक तपासात लता यांचा गळा आवळून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अत्यंत निर्घृण पद्धतीने लता यांची हत्या करण्यात आली. तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.