तीन वर्षापासून महिला बेपत्ता होती, बाप वेड्यासारखा मुलीला शोधत होता, अखेर तीन वर्षांनी शोध थांबला पण…

तीन वर्षापासून महिला बेपत्ता होती. महिलेच्या वडिलांसह पोलीसही तिचा खूप शोध घेत होते. मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर तीन वर्षांनी जे समोर आलं त्याने वडिलांना धक्काच बसला.

तीन वर्षापासून महिला बेपत्ता होती, बाप वेड्यासारखा मुलीला शोधत होता, अखेर तीन वर्षांनी शोध थांबला पण...
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला पतीने संपवले
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 3:39 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक महिला तीन वर्षापासून बेपत्ता होती. महिलेच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तीन वर्षे वडील मुलीसाठी पोलीस ठाण्याच्या खेटा घालत होते. तीन वर्षांनी अखेर मुलीचा शोध लागला. पण जे दृश्य समोर आलं ते पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. तीन वर्षापूर्वीच पतीने महिलेची हत्या केली होती. हत्या करुन मृतदेह सेप्टीक टँकमध्ये टाकला होता. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली होती. मात्र ठो, पुराव्याअभावी त्याला जामिन मिळाला. सीबीआय याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

मार्च 2020 पासून महिला बेपत्ता होती

भोंबल मंडल आणि त्याची पत्नी टुम्पी मंडल सोनारपूरमध्ये वास्तव्यास होते. मार्च 2020 मध्ये टुम्पा अचानक गायब झाली. शोधाशोध करुनही ती सापडत नव्हती. अखेर तिच्या वडिलांनी सोनारपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीसही महिलेचा शोध घेत होते. मात्र तरीही तिचा शोध लागत नव्हता. महिलेच्या पतीलाही ताब्यात घेण्यात आले होते. सतत पतीची चौकशी सुरु होती. मात्र तो ही काहीच माहिती देत नव्हता. अखेर कोर्टाने सीबीआयकडे तपास सोपवला.

सीबीआय चौकशीत पतीकडून हत्येची चौकशी

सीबीआयने भोंबलची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपणच पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. हत्या करुन मृतदेह घरातील सेप्टीक टँकमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. यानंतर पतीला अटक करण्यात आली होती. मात्र ठोस पुराव्यांअभावी त्याची जामिनावर सुटका झाली. पोलीस भोंबलच्या घरातील सेप्टीक टँकमधून मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, भोंबलने पत्नीची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.