Panvel Crime : मोबाईल जास्त वापरते म्हणून आई-वडिल ओरडले, रागाच्या घरात मुलीने जे केले त्याने पनवेल हादरले !

हल्लीच्या तरुणाईला कोणत्या गोष्टीचा राग येईल आणि तरुणी रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे.

Panvel Crime : मोबाईल जास्त वापरते म्हणून आई-वडिल ओरडले, रागाच्या घरात मुलीने जे केले त्याने पनवेल हादरले !
क्षुल्लक कारणातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:26 PM

पनवेल / 31 ऑगस्ट 2023 : मोबाईल जास्त वापरते म्हणून आई-वडिल ओरडल्याच्या रागातून 20 वर्षीय तरुणीने जे केले त्यानंतर पनवेल हादरले. कुणीही कल्पनाही केली नसेल तरुणीसोबत असे काही घडेल. घटना उघड होताच आई-वडिलांना मानसिक धक्काच बसला. रागाच्या भरात तरुणीने नदीत उडी घेत जीवन संपवले. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. सात दिवसांनी मुलीचा मृतदेह नदीच्या किनारी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटवत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. क्षुल्लक कारणातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काय घडलं नेमकं?

पनवेल तालुक्यातील कासारभाट गावात कुटुंबासोबत राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला मोबाईलचे व्यसन जडले होते. ती मोबाईल जास्त पहायची. तिच्या या सवयीमुळे 23 ऑगस्ट रोजी आई-वडिल तिला ओरडले. यामुळे रागावलेली तरुणी दुपारी घरातून निघून गेली. यानंतर संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध सुरु केला. मात्र मुलगी कुठेही सपाडली नाही.

आई-वडिलांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तरुणीचा शोध घेत होते. मात्र तरुणी कुठेही सापडत नव्हती. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या पात्रात तरुणीचा मृतदेह तरंगताना मच्छिमाराने पाहिले. यानंतर पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अंगवारील कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.