Vasai Youth Death : औषध लावून केस उन्हात सुकवत होता, टेरेसच्या कठड्यावरुन तोल गेला अन्…

भुवन दररोज केसांना औषध लावून टेरेसवर सुकवण्यासाठी जायचा. नेहमीप्रमाणे आज संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास भुवन केसाला औषध लावून टेरेसच्या कठड्यावर बसला होता. यावेळी अचानक भुवनचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.

Vasai Youth Death : औषध लावून केस उन्हात सुकवत होता, टेरेसच्या कठड्यावरुन तोल गेला अन्...
वसईत टेरेसवरुन पडून तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 11:04 PM

वसई : टेरेसवर केस सुकवत बसला असताना तो जाऊन खाली पडल्याने एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वसईत घडली आहे. भुवन कनौजिया असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. वसईच्या विशाल नगर परिसरात येथील रॉयल शाळेच्या आवारातील इमारतीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

भुवनला केसांची काहीतररी समस्या होती

भुवनचे वडिल याच रॉयल शाळेत बस चालक म्हणून काम करतात. भुवनच्या केसांची काहीतरी समस्या होती. यासाठी त्याचे औषधोपचार सुरु होते. डॉक्टरांनी केसाला लावायला औषध दिले होते.

केसांना औषध लावून टेरेसवर सुकवत होता

भुवन दररोज केसांना औषध लावून टेरेसवर सुकवण्यासाठी जायचा. नेहमीप्रमाणे आज संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास भुवन केसाला औषध लावून टेरेसच्या कठड्यावर बसला होता. यावेळी अचानक भुवनचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.

हे सुद्धा वाचा

दुर्घटनेत भुवनचा जागीच मृत्यू

या दुर्घटनेत भुवनचा जागीच मृत्यू झाला. वसईतील जी. जी कॉलेजमध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. भुवनला फिट येण्याचा त्रास होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

माणिकपूर पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे कनौजिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

घटनास्थळी माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी आकस्मिक नोंद केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.