Youth Death : फेसबुकवर ‘लव यू जानू’ लिहून जीवन संपवलं, तरुणीने का उचलले टोकाचे पाऊल?

तरुणाची फेसबुकवरील पोस्ट आणि व्हिडिओ पाहता प्रेमप्रकरणातून त्याने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपासाअंतीच सत्य उघडकीस येईल.

Youth Death : फेसबुकवर 'लव यू जानू' लिहून जीवन संपवलं, तरुणीने का उचलले टोकाचे पाऊल?
फेसबुक पोस्ट टाकून तरुणाने स्वतःला संपवले !Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 6:45 PM

हरदोई : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरदोई येथील एका तरुणाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर ‘लव यू जानू’ असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. योगेंद्र यादव ऊर्फ राज यादव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत. तपासानंतरच योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मरणापूर्वी फेसबुकवर लिहिली पोस्ट

जगदीशपूर येथील रहिवासी योगेंद्र यादव याने फेसबुकवर राज यादव नावाने अकाऊंट बनवले होते. या अकाऊंटवरुन ‘लव यू जानू’ और आगे ’22 को नहीं आज ही मरने वाला हूँ..’ लिहून पोस्ट शेअर केली होती. याशिवाय त्याने फेसबुक दोन व्हिडिओही शेअर केले होते, ज्यात तो गाणे म्हणत आहे.

शाळेच्या पाठीमागे जाऊन जीवन संपवले

यानंतर शनिवारी कस्तुरबा गांधी कन्या शाळेच्या मागे गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण लटकत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

हे सुद्धा वाचा

तरुणाच्या आत्महत्येबाबत सखोल तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

तरुणाची फेसबुकवरील पोस्ट आणि व्हिडिओ पाहता प्रेमप्रकरणातून त्याने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपासाअंतीच सत्य उघडकीस येईल. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.