रील्स बनवणं पडलं महागात, पोलीसांच्या हाती तरुणाच्या रील्सचं भूत पोहचलं, नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं
रील्स बनवून दहशत निर्माण करण्याचा फैजानचा हेतु होता, तलवारही त्याने नाशिकमधूनच खरेदी केली होती, त्या इसमालाही नाशिक पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक : अलिकडच्या काही महिन्यांपासून रील्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करण्याचं भूत अनेकांना लागलं आहे. हेच भूत वेगवेगळ्या घटकांतील व्यक्तींना लागल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेले अनेक जण या रील्सच्या आहारी गेले आहेत. असेच वेगवेगळे रील्स बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरुण करतांना दिसून येत आहे. असाच एक रील्स नाशिक पोलीसांच्या हाती नुकताच लागला आहे. त्यावरून नाशिक शहर पोलीसांच्या पथकाने तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर रील्स बनवून शेअर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मिडियचे भूत चढलेल्या तरुणाने हातात तलवार घेऊन, हिंदी गाण्यांचे म्युझिक लावून रील्स बनवून शेअर केले होते. त्यावरून नाशिक शहर पोलीसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत असून तरुणाच्या डोक्यातील सोशल मीडियावरील रील्सचं भूत पोलीसांनी उतरवलं आहे.
नाशिक शहरातील भारतनगर येथील 19 वर्षीय तरुण फैजान नईम शेख याने हातात धार धार तलवार घेऊन त्याचा रील्स बनवून शेअर केला होता.
हाच रील्स नाशिक शहर पोलीसांच्या हाती लागला आणि त्यांनी रील्स शेअर केलेल्या तरुणाचा शोध घेतला, त्याला अटक करत त्याच्याकडून एक तलवार देखील जप्त केली आहे.
रील्स बनवून दहशत निर्माण करण्याचा फैजानचा हेतु होता, तलवारही त्याने नाशिकमधूनच खरेदी केली होती, त्या इसमालाही नाशिक पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिकच्याच भारतनगर परिसरात राहणाऱ्या सचिन इंगोले या व्यक्तिकडून तलवार विकत घेतल्याने त्याची झाडाझडती पोलीसांनी घेतली असून त्याच्याकडून धारधार शस्र हस्तगत गेले आहे.
सोशल मीडियावर शस्र घेऊन रील्स करणे अनेकदा आढळून येते, मात्र संबंधित व्यक्तीचा शोध घेणे किंवा रील्स कुठला आहे याचा शोध घेणे अवघड होते त्यामुळे अनेकदा कारवाई होत नाही.
मात्र, नाशिकमधील रील्स बनविणाऱ्या तरुणाला नाशिक शहर पोलीसांनी चांगलीच अद्दल घडवली असून थेट गुन्हा दाखल करत त्याचे सोशल मिडियाचे भूत उतरविल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे.