AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Viral Message : महिलेला ‘आय लाइक यू’ मेसेज पाठवला…. पतीने धू धू धुतले…! प्रेमवीराचा ‘लोच्या’ सोशल मीडियात व्हायरल

महिलेच्या पतीकडून झालेल्या बेदम मारहाणीमुळे संतापलेल्या प्रेमवीराने ट्विटरवरून न्यायाची लढाई सुरु केली आहे. त्याच्या या धडपडीचा पंजाब पोलिसांनी खरमरीत ट्विट करीत समाचार घेतला आहे.

Punjab Viral Message : महिलेला 'आय लाइक यू' मेसेज पाठवला.... पतीने धू धू धुतले...! प्रेमवीराचा 'लोच्या' सोशल मीडियात व्हायरल
पंजाबमधील प्रेमवीराचा 'लोच्या' सोशल मीडियात व्हायरलImage Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2022 | 1:54 AM
Share

चंदिगढ : पंजाबमधील प्रेमवीराचा ‘लोच्या’ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. या प्रेमवीराने एका अनोळखी महिलेला ‘आय लाइक यू’ मेसेज (Message) पाठवला. हा मेसेज प्रेमवीराला चांगलाच महागात पडला आहे. त्याने ज्या महिलेला मेसेज पाठवला, त्या महिलेच्या पतीने प्रेमवीराची चांगलीच धुलाई केली आणि त्याच्या ऑनलाईन कारनाम्याला मोठा दणका दिला. महिलेच्या पतीने केलेल्या मारहाणीबाबत प्रेमवीराने ट्विट (Tweet) करून पोलिसांकडे तक्रार केली आहे. प्रेमवीराने माफी मागितली. मात्र त्यामुळे महिलेच्या पतीचा संताप थंड झाला नाही. त्याच्या माफीनाम्यानंतरही महिलेच्या पतीने त्याला मारहाण केली. त्यामुळे प्रेमवीराने आता पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. एक मेसेज प्रेमवीराला महागात पडला असून या प्रकारावर पोलिसांच्याही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर प्रेमवीराने पोलिसांना केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल होत आहे.

पंजाब पोलिसांचा ‘प्रेमळ’ सवाल, म्हणाले…..

महिलेच्या पतीकडून झालेल्या बेदम मारहाणीमुळे संतापलेल्या प्रेमवीराने ट्विटरवरून न्यायाची लढाई सुरु केली आहे. त्याच्या या धडपडीचा पंजाब पोलिसांनी खरमरीत ट्विट करीत समाचार घेतला आहे. एका अनोळखी महिलेला अनपेक्षित मेसेज पाठवून तुम्हाला त्या बदल्यात काय अपेक्षित होते? हे आम्हाला ठाऊक नाही. पण त्या महिलेच्या पतीने तुम्हाला मारहाण करायला नको होती. आपण तक्रार करायला हवी होती. आम्ही महिलेच्या पतीला कायदेशीर कलमांतर्गत शिक्षा केली असती. तूर्तास या दोन्ही गुन्ह्यांबाबत कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी ट्विटरवरून दिले आहे.

प्रेमवीरांची ट्विटरवरून पोलिसांकडे तक्रार

सुशांत दत्त असे अनोळखी महिलेला मेसेज पाठवणाऱ्या प्रेमवीराचे नाव आहे. त्याने पंजाब पोलिसांना टॅग करत ट्विट केले, त्यात त्याने लिहिले. ‘सर, मी एखाद्याला ‘आय लाइक यू’ मेसेज पाठवला आहे. काल रात्री तिच्या पतीने मला बेदम मारहाण केली. मी पुन्हा पुन्हा माफी मागत राहिलो. पण आता मला माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटत आहे. कृपया मला मदत करा आणि माझे जीवन वाचवा. माझ्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो, असे प्रेमवीर सुशांत दत्तने म्हटले आहे. सुशांत दत्त हा आरटीआय कार्यकर्ता आहे. त्याने नंतर आपले ट्विट डिलीट केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना पंजाब पोलिसांनी तुम्हाला कोणीही मारहाण करणार नाही, असे म्हटले आहे. तसेच अज्ञात व्यक्तीला असा मेसेज करू नये. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (A young man was beaten up by her husband for texting a woman in Punjab)

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.