चायनीज खायला गेला…चायनीज राहिलं बाजूला मिळाला बेदम मारहाण…चायनीज गाड्यावर असं काय घडलं ?
संशयितांनी जखमीच्या वडिलांना पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वणी पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर शेवाळे, मालेगाव ( नाशिक ) : किरकोळ कारणावरून थेट जीवावर उठल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. अशीच काहीशी घटना नाशिक जिल्ह्यातील वणी येथे घडली आहे. क्षुल्लक कारणावरून धारधार शस्राचा वापर करत वार करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये खुर्चीला धक्का लागल्याचा कारणावरून चार जणांनी एकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वणी येथे घडलेल्या या घटनेची संपूर्ण जिल्हाभर चर्चा आहे. याप्रकरणी जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. या घटणेप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे. चायनीज खायला गेलेल्या ठिकाणी हा हल्ल्या घडल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील एका हॉटेलमध्ये प्रकाश गांगोडे हा तरुण चायनीज खाण्यासाठी गेला होता. त्याच दरम्यान त्याच्याकडून बाजूला बसलेल्या मुलाच्या खुर्चीला नजरचुकीने धक्का लागला.
खुर्चीला धक्का लागल्याचा कारणावरून चार जणांनी एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत गंभीर जखमी केले. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
संशयितांनी जखमीच्या वडिलांना पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वणी पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातीळ तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे. वणी पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान या घटनेनंतर चायनीज खाण्यासाठी गेलेल्या तरुणाला चायनीज खायला मिळालं नसून बेदम मारहाण झाल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.