भयानक ! मोक्षप्राप्तीसाठी 22 वर्षीय साधूने केले ‘हे’ कृत्य, वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही !

साधू वेशधारी तरुणाने मोक्ष मिळवण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने समाधी घेण्याचे ठरवले व मंदिरातील चार पुजारींची मदत मिळवली.

भयानक ! मोक्षप्राप्तीसाठी 22 वर्षीय साधूने केले 'हे' कृत्य, वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही !
मोक्षप्राप्तीसाठी साधूने घेतली समाधीImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 11:51 PM

उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये अंधश्रद्धेतून (Superstition) एका तरुण साधू (Sadhu)ने त्याच्या जीवावर बेतणारा प्रकार केला. मोक्ष (Moksha) मिळवण्यासाठी 22 वर्षांच्या साधूने मंदिरातील चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतले होते. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जिवंत समाधी घेऊ पाहणाऱ्या साधूला जमिनीतून बाहेर काढले. त्यामुळे त्या साधूचे प्राण वाचले. मंदिराच्या परिसरात हा प्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

साधूला मदत करणाऱ्या चार पुजारींना अटक

साधू वेशधारी तरुणाने मोक्ष मिळवण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने समाधी घेण्याचे ठरवले व मंदिरातील चार पुजारींची मदत मिळवली. साधूसाठी मंदिराच्या परिसरातच खोल खड्डा खोदण्यात आला होता. त्यात साधू गेल्यानंतर वरुन माती टाकून खड्डा बुजविण्यात आला होता.

वास्तविक हा प्रकार साधूच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चारही पुजारींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. साधू वेशधारी तरुण खड्ड्यामध्ये जवळपास सात मिनिटे दफन राहिल्याचे उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा

आशिवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूर गावात ही घटना घडली आहे. या घटनेने ग्रामीण भागातील अंधश्रद्धेतून व अनिष्ट प्रथेतून अजूनही जीवघेणे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगरमाऊचे सीओ पंकज कुमार सिंह यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नागरिकांनी दिली पोलिसांना माहिती

ताजपूर गावातील लोकांनी घटनेबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवले आहेत. 22 वर्षीय साधू वेशधारी तरुण शुभम हा संध्याकाळी मंदिराजवळ समाधी घेण्याच्या तयारीत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला बाहेर काढले

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे शुभमने समाधी घेतल्याचे पोलिसांना आढळले. मंदिरातील चार पुजारी साधू शुभमचे दफन करून मातीवर लाल ध्वज फडकवत होते. पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता शुभमला खड्ड्यातून बाहेर काढले.

सुदैवाने तो जिवंत होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. केवळ मोक्ष मिळेल या अंध भावनेतून त्याने हा प्रकार केल्याचे निदर्शनास येताच पोलिसही चक्रावून गेले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.