लहान भाऊच मोठ्या भावाच्या जीवावर बेतला, कारण काय?

दोन भावांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना बिहारमधील दरभंगा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लहान भाऊच मोठ्या भावाच्या जीवावर बेतला, कारण काय?
आई आणि मुलांचा संशयास्पद मृ्तयूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 2:00 PM

दरभंगा : क्षुल्लक कारणातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लहान भावाला अटक केली आहे. माखनपूर गावात ही घटना घडली आहे. दोघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून रस्त्यावरुन वाद सुरु होते. त्यातच सोमवारी मोठ्या भावाच्या छतावर सुकत घातलेले कपडे छोट्या भावाच्या अंगणात पडल्याच्या कारणातून वाद झाला. याच वादातून लहान भावाने मोठ्या भावाला मारहाण केली. यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला. सज्जन मंडल असे मयत भावाचे नाव आहे, तर राजेश मंडल असे आरोपी भावाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मयत सज्जन मंडलच्या घरच्यांनी घराच्या छतावर कपडे सुकत घातले होते. हवेमुळे कपडे उडाले आणि राजेश मंडलच्या अंगणात पडले. हे कपडे आणण्यासाठी सज्जन मंडलची नात गेली होती. यावेळी राजेश मंडलने कपडे जाळण्याचे आणि मुलीला मारहाण करण्याची भाषा करत मुलीला हाकलून दिले.

यावरुन दोघा भावांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की, राजेश मंडलने सज्जनला खाली जमिनीवर ढकलले. यानंतर त्याला जोरदार मारहाण सुरु केली. मारहाणीनंतर सज्जन मंडलची तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी मयत सज्जन मंडलचा मुलगा विजय मंडलने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.