Buldhana Youth Drowned : अंत्यसंस्कारासाठी गेला होता तरुण, तलावात पोहण्याचा मोह आवरेना, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील मृत गणेश दानवे हा युवक गावाच्या बाहेर असलेल्या रतन तलावाशेजारी अंत्यसंस्कारासाठी गेला होता. मात्र स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलावात अंघोळ करायला गेला असता तो पाण्यात बुडला.

Buldhana Youth Drowned : अंत्यसंस्कारासाठी गेला होता तरुण, तलावात पोहण्याचा मोह आवरेना, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 4:56 PM

बुलढाणा : अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरुणा (Youth)चा तेथील तलावात बुडून मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना 13 जुलै रोजी साखरखेर्डा येथे घडली आहे. गणेश बाबुराव दानवे असे मयत तरुणाचे नाव आहे. साखरखेर्डा गावातीलच एका वृध्द महिलेच्या अंत्यसंस्कारसाठी या तलावाजवळील स्मशानभूमीत गणेश गेला होता. मात्र अंत्यसंस्कार झाल्यावर त्याला या तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि पोहण्यासाठी तो तलावात उतरला. मात्र तलावातील खोल पाण्यात बुडून (Drowned) त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तलावात अंघोळीसाठी गेला अन् बुडाला

बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील मृत गणेश दानवे हा युवक गावाच्या बाहेर असलेल्या रतन तलावाशेजारी अंत्यसंस्कारासाठी गेला होता. मात्र स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलावात अंघोळ करायला गेला असता तो पाण्यात बुडला. यावेळी काही युवकांनी त्याला विरोधही केला. परंतु कुणाचेही न ऐकता सरळ तो तलावात काही अंतरावर चालत गेला. आपण सहज पुढच्या काठावर जाऊ शकतो, असा भ्रम त्याला झाला असावा आणि तलावाच्या मधोमध जात नाही तोच गणेश पाण्यात बुडाला. तलावाची पातळी खोलवर असल्याने शोध घेऊनही तो सापडला नाही. गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे घटनेच्या दिवशी गणेशचा मृतदेह तलावात सापडला नव्हता. पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. परंतु काल एनडीआरएफच्या टीमने शोध मोहिम राबवली आणि तलावत असलेल्या युवकाचा मृतदेह त्यांना सापडला. (A youth drowned in lake while swimming in Buldhana)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.