त्याने प्यायला पाणी मागितलं त्यांनी तोंडावर फेकलं, मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल !

तरुणाने प्यायला पाणी मागितले. पण पाण्यावरुन पुढे घडलं ते त्याने एकच खळबळ माजली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस पुढील तपास करत आहेत.

त्याने प्यायला पाणी मागितलं त्यांनी तोंडावर फेकलं, मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल !
क्षुल्लक कारणातून दोन गटातील वादातून तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 6:07 PM

इंदूर : क्षुल्लक कारणातून तरुणाला संपवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. एका तरुणाने पाणी प्यायला मागितले मात्र तरुणांनी त्याच्या तोंडोवरच पाणी फेकले. यानंतर दोन गटात वाद झाला मग पाणी मागणाऱ्या तरुणाला दुसऱ्या गटाने संपवल्याची धक्कादायक घटना घडली. टोनी उर्फ इमरान असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून, आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

इमरान हा त्याच्या मित्रांसोबत येत होता. यावेळी त्याने चंदन मगर परिसरातील काही तरुणांकडे पाणी मागितले. मात्र त्याला पाणी देण्याऐवजी एक आरोपी वसीम उर्फ नथ्थु याने इमरानच्या तोंडावर पाणी फेकले. यानंतर दोन गटात जोरदार वाद झाला. वादातून वसीमच्या गटाने इमरानची हत्या केली. मयत तरुणाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामुळे तरुणाची हत्या नक्की पाण्याच्या वादातून झाली की अनैतिक संबंधातून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.

यूपीत क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला संपवले

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. बॉलिंग करणाऱ्या तरुणाने क्लीन बोल्ड केल्याने संतापलेल्या बॅट्समनने त्याला मारहाण करत त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे क्रिकेटच्या मैदानात अचानक स्मशान शांतता पसरली.

हे सुद्धा वाचा

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.