नाचताना धक्का लागल्याचा जाब विचारला, माथेफिरुने थेट तरुणाच्या चाकू पोटात खुपसला!

सागरची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपी कुणाल वाहुळ याला बेड्या ठोकल्या आहेत.

नाचताना धक्का लागल्याचा जाब विचारला, माथेफिरुने थेट तरुणाच्या चाकू पोटात खुपसला!
क्षुल्लक कारणातून तरुणावर चाकूहल्लाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 8:06 PM

उल्हासनगर : वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना धक्काबुक्की करणाऱ्याला जाब विचारल्याने तरुणाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल वाहुळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाढदिवसानिमित्त नाचत होते तरुण

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात मंगळवारी रात्री राजू बनकर यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त सागर गायकवाड यांच्या घरासमोर सागर याच्यासह रोशन बनकर सोनू गायकवाड आणि इतर मित्र नाचत होते.

आरोपी धक्काबुक्की करत होता म्हणून हटकले

यावेळी त्यांच्याच ओळखीतला कुणाल वाहुळ हा तिथे आला आणि सागर आणि त्याच्या मित्रांना धक्काबुक्की करू लागला. त्यामुळे सागर याने त्याला धक्काबुक्की करू नको, नीट नाच, अन्यथा इथून निघून जा, असं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

हटकल्याचा राग आल्याने पोटात चाकू खुपसला

कुणाल याला त्याचा राग आल्याने तो तिथून निघून गेला आणि काही वेळाने पुन्हा आला. त्यानंतर त्याने सागर याच्या पोटात धारदार चाकू खुपसला. या हल्ल्यात सागर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि तिथून मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला त्याला हलवण्यात आलं.

जखमी तरुणाची प्रकृती गंभीर

सागरची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपी कुणाल वाहुळ याला बेड्या ठोकल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.