चालत्या स्कूटीवर जोडप्याचा रोमान्स व्हायरल, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात हा प्रकार घडला. अल्पवयीन प्रेमीयुगुल स्कुटीवरून जात असताना त्यांच्या आक्षेपार्ह कृत्यावर अनेकांनी आक्षेप घेत मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आला.
लखनऊ : सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणे किती महागात पडू शकते याची प्रचिती एका घटनेतून आली आहे. पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला ताब्यात घेऊन दोघांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. या घटनेतील प्रेमीयुगुल भररस्त्यात दुचाकीवरून जात असताना एकमेकांशी रोमान्स करीत होते. सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कृत्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अल्पवयीन प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. यापैकी तरुण हा स्कुटी चालवत होता. अल्पवयीन प्रेयसी घट्ट मिठी मारून त्याच्याबरोबर रोमान्स करत होती. धावत्या स्कुटीवरच तिने प्रियकराला किस करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. यामुळे सामाजिक पातळीवर चुकीचा संदेश गेल्याचा आरोप करीत घटनेवर सोशल मीडियातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
स्कूटीवरुन रोमान्स करत चालले होते प्रेमीयुगुल
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात हा प्रकार घडला. अल्पवयीन प्रेमीयुगुल स्कुटीवरून जात असताना त्यांच्या आक्षेपार्ह कृत्यावर अनेकांनी आक्षेप घेत मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आला.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई
व्हिडिओ व्हायरल होतात पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लखनऊच्या स्थानिक पोलिसांना कारवाईबाबत निर्देश दिले. पोलिसांनी प्रेमीयुगुलापैकी प्रियकराचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. तरुणाविरोधात कलम 279 आणि 294 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आरोपीला होऊ शकते सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा
विकी असे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने सार्वजनिक रस्त्यावरून बेदरकारपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 279 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरधाव वेगाने ड्रायव्हिंग करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जातो.
या गुन्ह्यासाठी किमान सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याचबरोबर किमान एक हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठीही स्वतंत्र शिक्षेची तरतूद आहे.