नदीवर अंघोळीला गेला होता, पाण्यात उडी घेताच अनर्थ घडला, तरुणासोबत नेमके काय घडले?

नेहमीप्रमाणे तरुण सकाळी नदीवर अंघोळीसाठी गेला. पाण्यात उडी घेताच तरुणासोबत जे घडले ते भयंकर होते. यामुळे ऐन सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली.

नदीवर अंघोळीला गेला होता, पाण्यात उडी घेताच अनर्थ घडला, तरुणासोबत नेमके काय घडले?
नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 10:12 PM

यवतमाळ / विवेक गावंडे : अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या तरुणाचा पाण्यात वीजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. अशोक विठ्ठल कुरमेलकर असे मयत तरुणाचे नाव आहे. ऐन अक्षय तृतियेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अशोक कायम नदीवर अंघोळीसाठी जात असे. नेहमीप्रमाणे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अशोक अंघोळीला गेला. मात्र ही अंघोळ त्याची शेवटची ठरली. यामुळे अक्षय तृतियेच्या सणाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेहमीप्रमाणे नदीवर अंघोळीला गेला तो परतलाच नाही

अशोक कायम नदीवर अंघोळ करत असे. नेहमीप्रमाणे आज सकळी तो पैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेला. मात्र यादरम्यान पाणी ओढण्याच्या मोटारीची वायर नदीच्या पाण्यात पडली होती. परिणामी नदीच्या पाण्यात वीज प्रवाह संचारला. अशोक याबाबत अनभिज्ञ होता. यामुळे त्यामुळे त्याने नेहमीप्रमाणे अंघोळीसाठी नदीत उडी घेतली. नदीत उडी घेतल्यानंतर पाण्याला स्पर्श करताच त्याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अशोकच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. पांढरकवडा पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ऐन सणाच्या दिवशी तरुणाच्या मृत्यमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...