केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई
केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे (ACB officials caught KDMC officials accepting bribes)
कल्याण (ठाणे) : केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसीचे 37 अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जातो, हेच यातून उघड होत आहे (ACB officials caught KDMC officials accepting bribes).
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाचे घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या सर्व सामान्य नागरिकाकडे 20 हजार रुपायांची मागणी केली. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अखेर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. हेच पंधरा हजार घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकारी कार्यालयात दोघांना रंगेहाथ पकडले (ACB officials caught KDMC officials accepting bribes).
एसीबीने आतापर्यंत 37 लाचखोर अधिकारी रंगेहाथ पकडले
याप्रकरणी सध्या एसीबीची कार्यवाही सुरु आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 37 अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. यामध्ये काही रुजू झालेले आाहेत. काही सेवानिवृत्त आहेत. धक्कादायक म्हणजे काही अधिकारी दोन वेळा लाच घेताना पकडले गेलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकामातून किती पैसा येतो. याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळेच इतके अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.