औषध खरेदीच्या माध्यमातून मेडिकल चालकाची ऑनलाईन फसवणूक, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

मेडिकल चालकाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दखल करत 24 तासाच्या आत फसवणूक करणाऱ्या आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

औषध खरेदीच्या माध्यमातून मेडिकल चालकाची ऑनलाईन फसवणूक, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
मेडिकल चालकाची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 9:39 PM

कल्याण : ऑनलाईन औषधे खरेदी करुन ऑनलाईन पैसे पाठवल्याचा मॅसेज करत मेडिकल चालकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रोशन गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आयुष्यमान मिश्रा असे त्याच्या फरार साथीदाराचे नाव आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

आरोपींनी ऑनलाईन औषध खरेदी केली

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या एका मेडिकल स्टोअर्समधून आयुष्यमान मिश्रा आणि रोशन गुप्ता या दोघांनी ऑनलाईन 51 हजार 700 रुपयांची औषधांची खरेदी केली होती. या औषधांचे बिल आयुष्यमान मिश्रा याच्या अकाउंटवरून पे केल्याचा मॅसेज रोशन गुप्ताने मेडिकल चालकाला पाठवला.

ऑनलाईन पैसे पाठवल्याचे भासवत फसवणूक

मात्र मेडिकल चालकाने अकाऊंट चेक केले असता प्रत्यक्षात पैसे अकाऊंटमध्ये आले नव्हते. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मेडिकल चालकाच्या लक्षात आले. मेडिकल चालकाने तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी 24 तासाच्या आत एकाच्या मुसक्या आवळल्या

मेडिकल चालकाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दखल करत 24 तासाच्या आत फसवणूक करणाऱ्या आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याचा अन्य एक साथीदार असल्याची माहितीही दिली.

फरार आरोपीचा शोध सुरु

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आयुष्यमान मिश्रा अद्याप फरार आहे. मिश्रा हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ 3 कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.