बांधकाम व्यवसायिकाला भोंदू बाबाने घातला 48 लाखांचा गंडा, मृत्यूनंतर डायरी सापडल्याने भांडाफोड, आरोपीला अटक

जादूटोण्याच्या नावाखाली, आपल्याच बांधकाम व्यवसायिक भागीदाराला लाखोंचा गंडा घालणाऱ्या एक भोंदूबाबाला विरारमधून अटक करण्यात आली आहे. या भोंदूबाबाने हिप्नॉटाईज करून, भागीदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला पुजेच्या नावाखाली तब्बल 48  लाखांचा गंडा घातला.

बांधकाम व्यवसायिकाला भोंदू बाबाने घातला 48 लाखांचा गंडा, मृत्यूनंतर डायरी सापडल्याने भांडाफोड, आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 6:47 PM

पालघर :  जादूटोण्याच्या नावाखाली, आपल्याच बांधकाम व्यवसायिक भागीदाराला लाखोंचा गंडा घालणाऱ्या एक भोंदूबाबाला विरारमधून (Virar) अटक करण्यात आली आहे. या भोंदूबाबाने हिप्नॉटाईज करून, भागीदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला पुजेच्या नावाखाली तब्बल 48  लाखांचा गंडा  ( Financial fraud) घातला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर या बांधकाम व्यवसायिकाचा या सर्व प्रकरणात मृत्यू झाल्याचा आरोप देखील संबधित व्यवसायिकाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात (Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद समीर अब्दुल शकुर उर्फ समीर कादरी (वय 41) असे या भोंदू बाबाचे नाव असून, तो विरार पूर्व गोपचर पाडा येथील रहिवासी आहे. विरार पूर्वेच्या गासकोपरी येथे राहणारे बांधकाम व्यवसायिक चंद्रदीप स्वामी आणि भोंदूबाबा या दोघांचे मैत्रीचे संबंध होते. यातूनच त्यांनी दोघांनी मिळून बांधकाम व्यवसाय सुरू केला होता.

अधिक नफा मिळवण्याचे अमिष

दोघांचे एकमेकांच्या घरी येणे -जाणे होते. चंद्रदीप स्वामी  हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. याचाच फायदा  घेण्याचे आरोपीने ठरवले.  त्यानंतर आरोपी समीद कादरी यांनी स्वामी यांना अधिक नफ्याचे आमिष दाखवले, अधिक नफा मिळवण्यासाठी घरात पुजा करावी लागेल असे सांगितले. माझ्या ओळखीमधील एक महाराज आहेत, जे दीडेश वर्षांपासून जीवंत आहेत. त्यांच्याशी मी तुमची ओळख करून देतो असे आरोपीने चंद्रदीप स्वामी यांना सांगितले. दरम्यानच्या काळात ओरोपीने चंद्रदीप स्वामी यांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप देखील त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 2014 पासून ते आतापर्यंत या भोंदूबाबाने स्वामी यांच्या कुटुंबाला तब्बल 48 लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

धुरामुळे ब्रेन कॅन्सर झाल्याचा दावा

दरम्यान हा भोंदूबाबा स्वामी यांना एका बंद खोलीमध्ये तासंतास पूजा करण्यास सांगायचा. तो संबंधित खोलीमध्ये कायम धूर ठेवायचा. या धुराचा त्रास होऊन, स्वामी यांना ब्रेन कॅन्सर झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. स्वामी यांच्या मृत्यूनंतर त्यांची हस्तलिखित डायरी त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती लागली. या डायरीमधून या भोंदूबाबाचा भांडाफोड झाला. या डायरीमधून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे स्वामी यांच्या कुटुंबीयांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता,  21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

भरारी पथकाची थरारक कारवाई! गोव्याची दारु विकायचा प्लान फसला, सापळा रचून 50 लाखाची अवैध दारु जप्त

Pimpri chinchawad crime | सायबर चोरट्यांकडून महापालिका आयुक्तांच्या प्रोफाईलचा वापर; आर्थिक मदतीची मागणी ; फसवणुकीला बळी न पडण्याचेआयुक्तांचे आवाहन

तरुणीच्या गळ्यात त्यानं आधी हात घातला, मग चाकूनं वार! बारामतीमधील थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.