अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार, आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोंदिया शहर पोलीस आरोपीची पुढील चौकशी करत आहेत.

अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार, आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 8:50 AM

गोंदिया / शाहिद पठाण : अल्पवयीन मुलीला पळवून नेत मग विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीला पकडण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. मनोज टेकाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवसापासू आरोपी फरार होता. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. आरोपीविरोधात कलम 376, (2) (एन), 363, 353 भादंवि, सहकलम 4, 6, 8, 12 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये दाखल गुन्ह्या दाखल होता.

घटना उघड होताच आरोपी होता फरार

मक्कीटोला येथील आरोपी मनोज टेकाम याने गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याची घटना जानेवारीमध्ये घडली होती. घटना उघडकीस येताच आरोपी फरार झाला होता. दोन महिन्यांपासून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते.

गोंदिया स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपीला अटक

यादरम्यान फरार आरोपी गोंदिया स्टेशन परिसरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गोंदिया स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. यानंतर सखोल चौकशीसाठी आरोपीला गोंदिया शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, पोलीस अंमलदार पोहवा प्रकाश गायधने, विठठल ठाकरे, चेतन पटले, पोलीस शिपाई हंसराज भांडारकर यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.