Rakhi Sawant : राखी सावंतच्या चालकाला यूपी पोलिसांकडून अटक, अभिनेत्रीचे पैसे आणि कार चोरुन झाला होता फरार
राखी सावंत हिचे पैसे, गोल्डन फोन आणि बीएमडब्लू कार चोरुन तिच्या चालकाने यूपीत पलायन केले होते. यूपी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
मुंबई / 25 जुलै 2023 : अभिनेत्री राखी सावंत हिचे दागिने, पैसे आणि बीएमडब्लू कार चोरुन पलायन करणाऱ्या चालकाला यूपी पोलिसांनी अटक केली आहे. पप्पू यादव असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी चालकाला पकडल्यानंतर राखी सावंतने यूपी पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहे. राखी सावंतच्या चालकानेच काही दिवसांपूर्वी तिचे दागिने आणि पैशांची चोरी केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांसह यूपी पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर यूपी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काय म्हणाली राखी?
माझ्या ड्रायव्हरला पकडल्याबद्दल यूपी पोलिसांना धन्यवाद. ड्रायव्हरला असे फटकवून काढा की पुन्हा असं करायची हिंमत होणार नाही. कोणताही ड्रायव्हर आपल्या मालकासोबत चोरी, बेईमानी करण्याची हिंमत करणार नाही. एका व्यक्तीची सजा दुसऱ्यांना मिळू नये, असे राखी सावंत म्हणाली. तसेच तिला यूपीवाल्यांवर खूप विश्वास आहे असेही ती बोलली.
पप्पू यादव हा उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी आहे. तो राखी सावंतकडे चालक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो राखी सावंतच्या गाडीतून पैसे आणि दागिन्यांसह कारची चावी घेऊन पलायन केले होते. यानंतर राखीने मुंबई आणि यूपी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरचे खासदार रवी किशन यांच्याकडे मदतीची याचना केली होती.
व्हिडिओ मॅसेजही जारी केला होता
राखी सावंत हिने एक व्हिडिओ मॅसेज करुन ड्रायव्हरच्या कृत्याबद्दल सांगितले होते. राखीच्या मॅसेजनंतर यूपी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि तात्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे. यानंतर राखीने उत्तर प्रदेश पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.