Amaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत

या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही बेपत्ता आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली. आणखी एक आरोपी शेख रहीम शेख इरफान या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे समजते. आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शेख याला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Amaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत
उमेश कोल्हे यांची हत्या करणारे आरोपी
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 4:48 PM

अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. उदयपूरमध्ये (Udaipur) कन्हैयालालची(Kanhaiyalal ) हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हीची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणातील मुख्यसूत्रधार आरोपी शेख रहीम शेख इरफान याला कोर्टाने 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही बेपत्ता आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली. आणखी एक आरोपी शेख रहीम शेख इरफान या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे समजते. आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शेख याला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर आणि फॉरवर्ड केली होती. हा मेसेज त्याने मुस्लिम लोक असलेल्या ग्रुपवरही केला. त्यामुळे या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे.

उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या हत्येआधीच झाली होती उमेश कोल्हेची हत्या

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे कनेक्शन थेट नुपूर शर्मा प्रकरणाशी जोडण्यात येत आहे. नुपूर शर्मा प्रकरणीच उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली होती. उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हेची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर काही वेळातच दोन तरुणांनी एक व्हिडिओ जारी केला आणि धारदार शस्त्रे दाखवून हत्येची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पोलिसांनी यांना अटक केली.

तर उदयपूरच्या कन्हैयाचा जीव वाचला असता; मृत उमेश कोल्हे यांच्या भावाचा दावा

वादग्रस्त नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. मृतक उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे प्रथमच प्रसार माध्यमा समोर आले. अमरावती पोलिसांनी चार ते पाच दिवसापूर्वी प्रकरण उघडकीस आणलं असतं तर राज्यस्थान मधील उदयपूरच्या कन्हैयाचा जीव वाचला असता असं महेश म्हणााले. माझ्या भावाच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला हे आमचं भाग्य आणि दुर्दैव दोन्ही आहे. यापुढे कोणाची हत्या होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी असं अवाहन महेश यांनी केले आहे.

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या देखील नुपूर शर्मा प्रकरणामुळेच

54 वर्षीय उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला असून नुपूर शर्मा प्रकरणामुळेच कोलेहे यांची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

कोल्हे यांचं स्वत:चं मेडिकल स्टोर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ते ठार झाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.