गोव्यात फिरायला गेलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग, मग चाकूहल्ला; रिसॉर्टमधील कामगाराला बेड्या

गोवा फिरायला आलेल्या परदेशी पाहुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. गोव्याचा आनंद लुटण्याआधीच महिलेसोबत भयानक कृत्य घडले. धक्कादायक बाब म्हणजे महिला राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये तिच्यासोबत भयानक घटना घडली.

गोव्यात फिरायला गेलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग, मग चाकूहल्ला; रिसॉर्टमधील कामगाराला बेड्या
गोव्यात परदेशी तरुणीचा विनयभंगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 1:32 PM

गोवा : गोव्यात फिरायला आलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग करत तिच्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर गोव्यातील मोरजी येथे गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पेडणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अभिषेक उमेशचंद्र शर्मा असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. यावेळी महिलेच्या बचावासाठी आलेल्या स्थानिक नागरिकावरही आरोपीने हल्ला केला. आरोपी एका रिसॉर्टमध्ये काम करतो.

उत्तर गोव्यातील एका बीच रिसॉर्टमध्ये घडली घटना

उत्तर गोव्यातील मोरजी येथील एका बीच रिसॉर्टमध्ये ही परदेशी पर्यटक महिला उतरली होती. काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिच्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती घुसली. यावेळी पर्यटक महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून युरेका डायस हा स्थानिक व्यक्ती तिच्या मदतीला धावला असता, तो व्यक्ती पळून गेला.

काही वेळाने पळून गेलेला व्यक्ती परत चाकू घेऊन आला. त्याने महिला पर्यटक आणि तिच्या मदतीसाठी धावून आलेला युरेका डायस या दोघांवरही चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले. संशयित अभिषेक वर्मा हा मूळ डेहराडून, उत्तराखंड येथील रहिवासी आहे.

हे सुद्धा वाचा

पेडणे पोलिसांकडून आरोपीला बेड्या

याप्रकरणी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महिलेच्या फिर्यादीवरुन पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, हरिश वायंगणकर, हवालदार तीर्थराज म्हामल, कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, सागर खोर्जुवेकर, प्रेमनाथ सावळ-देसाई, रजत गावडे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार आणि पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.