एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे पुढील अनर्थ टळला !

वारंवार तगादा लावूनही तरुणी लग्नाला नकार देत असल्याने संतापलेल्या तरुणाने भररस्त्यात तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे पुढील अनर्थ टळला !
चंद्रपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 9:55 AM

चंद्रपूर / निलेश डहाट : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून, तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. लवेश वामन देऊळकर असे अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीचा तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला.

आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते

आरोपी लवेश देऊळकर हा तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. अनेक दिवसापासून त्याने तरुणीकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र तरुणी त्याला नकार देत होती. आरोपी मिस्त्री काम करतो. आरोपी हा पीडित तरुणीच्या आईचा मानलेला भाऊ आहे. तो पीडितेला वेगवेगळ्या नंबरवरून वारंवार फोन करून त्रास देऊन लग्नाची मागणी घालत होता.

तरुणी नकार देत असल्याने संतापलेल्या तरुणाकडून जीवघेणा हल्ला

परंतु, तिची आई त्याला भाऊ मानत असल्याने तिने नकार देऊन फोन न करण्याबाबत वारंवार बजावले होते. या रागातून त्याने तिच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. ब्रम्हपुरी येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळून तरुणी आपल्या आईसोबत जात असताना तरुणाने मागून येत भररस्त्यातच तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केला. तिची हत्या करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, सतर्क नागरिकांनी धाव घेत त्या तरुणाला पकडले. नंतर पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

हे सुद्धा वाचा

आरोपीला अटक

ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन बारसागडे हे त्याच भागात असल्याने त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द कलम 307, 354 (ड) सहकलम 3 (2) (व्ही) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे करीत आहेत.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.