Pune Crime : सहकारी महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला, मग व्हायरल करण्याची धमकी देत केली ‘ही’ मागणी
पुण्यात गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुन्हा एक भयंकर घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
पुणे / 16 जुलै 2023 : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दररोज काही ना काही घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुनील हरीबा कांबळे असे अटक आरोपीचे नाव आहे. पीडिता आणि आरोपी दोघे एकाच कंपनीत काम करतात. आरोपीने महिलेचा बाथरुममध्ये व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे पैसे आणि शरीरसुखाची मागणी करत होता.
महिलेकडे शरीरसुख आणि पैशांची मागणी
आरोपीने शनिवारी महिलेचा बाथरुममधील व्हिडिओ बनवला. यानंतर महिलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे हा व्हिडिओ पाठवला. मग हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरीरसुख आणि 30 हजार रुपयाची मागणी केली. यानंतर पीडित महिलेने थेट भोसरी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी सोनावणे विरोधात गुन्हा दाखल केला.
आरोपीविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंडसंहिता कलम 354 (अ)(2), 354 (क) 506 सह माहिती तंत्रज्ञान कलम 66 (क) आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.