Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, त्या गोष्टीवर कोर्टाची नाराजी
अभिनेता याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अथक तपास करून दोन शूटर्ससह आणखी दोघांना अटक केली होती. मात्र त्या आरोपींपैकी एक असलेल्या अनुज थापन याने काही दिवसांपूर्वी तुरूंगात असतानाच गळफास लावून जीवन संपवलं. अनुज थापनच्या अपूर्ण शवविच्छेदन अहवालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अथक तपास करून दोन शूटर्ससह आणखी दोघांना अटक केली होती. मात्र त्या आरोपींपैकी एक असलेल्या अनुज थापन याने काही दिवसांपूर्वी तुरूंगात असतानाच गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळ एकच खळबळ माजली अनुज याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. आता याप्रकरणी आणखी एक अपडेट समोर आले आहे. अनुज थापनच्या अपूर्ण शवविच्छेदन अहवालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे, सलमान खान याच्यावर आपण कोणतेही आरोप केलेले नाहीत किंवा त्याच्याविरोधात कारवाईची मागणीही केलेली नाही, असे नमूद करून याचिकेतून सलमान याचे प्रतिवादी म्हणून नाव वगळण्याची तयारी अनुज याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दाखवली आहे. अनुज याच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येविरोधात अनुजच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनुज याची आत्महत्या संशयास्पद असल्याचा दावा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्याच्या आईने केली आहे.
अनुज याच्या मृत्यूची महानगरदंडाधिकारी तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) केल्या जाणाऱ्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी तपास यंत्रणेचा प्राथमिक चौकशी अहवाल अनुज याच्या शवविच्छेदन अहवालासह मोहोरबंद पाकिटात न्यायासयात सादर केला. त्याचवेळी, अनुज याच्या कोठडीतील मृत्यूची महानगरदंडाधिकाऱ्यांतर्फे अद्याप चौकशी सुरू असल्याचेही न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालन खंडपीठाने अनुज याचा शवविच्छेदन अहवाल वाचल्यानंतर तो अपूर्ण असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अनुज याने गळफास लावून घेतला तर त्याच्या मानेवरील जखम तसेच शरारीवरील इतर जखमांसारख्या महत्त्वपूर्ण तपशीलाचा शवविच्छेदन अहवालात समावेश नसल्याच्या मुद्यावर खंडपीठाने बोट ठेवले.
अनुज थापनने कोठडीत संपवलं जीवन
1 मे रोजी अनुज थापन याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला. त्याची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता. 14 एप्रिल, रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटधील सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला होता. बाईकवररून आलेले दोन्ही शूटर्स गोळीबार करून तातडीने फरार झाले आणि मजल दरमजल करत ते गुजरातच्या भुज येथील एका मंदिरात जाऊन लपले होते. मुंबई पोलिस तसेच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत त्या शूटर्सना शोधून काढले होते. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्या आरोपींची नावे होती. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती.
त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. या आरोपींपैकीच अनुज थापन याने आज पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याने चादरीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.