नवविवाहित दाम्पत्यामध्ये वादाची ठिणगी; डॉक्टर पती पोहचला पोलीस ठाण्यात कारण…
अरिंदम हा २८ वर्षांचा असून व्यवसायाने डॉक्टर आहे. अरिंदम पीजीमध्ये एमडीचा अभ्यास करत आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यात बागदा येथे एका डॉक्टरने पत्नीची हत्या केली. त्यानंतर ही घटना त्याने आपल्या भावाला सांगितली. नंतर डॉक्टर थेट पोलीस ठाण्यात पोहचला. स्वतःला त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. डॉक्टरने पत्नीच्या गळ्यातील नळीवर चाकू फिरवला. शनिवारी रात्री ही घटना उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या बागदा येथे घडली. आरोपी अरिंदम बाला हा मांडवाघाटा गावातील राहणारा आहे. अरिंदम हा २८ वर्षांचा असून व्यवसायाने डॉक्टर आहे. अरिंदम पीजीमध्ये एमडीचा अभ्यास करत आहे.
दोन वर्षांपूर्वी अरिंदमचे लग्न नीलगंज येथील रत्नामा डे (वय २५ वर्षे) या युवतीशी झाले. लग्नानंतर त्यांचे आपसात पटत नव्हते. दोघांमध्ये नेहमी वाद होत असतं. आठ महिन्यांपूर्वी रत्नामा या सासर सोडून माहेरी गेल्या होत्या. शनिवारी रात्री अरिंदम रत्नामा यांना घरी घेऊन आला. वडील विवेकानंद बाला आणि अनिर्बान बाला यांना जेवण करायचे असल्याचे सांगून वरच्या खोलीत गेले.
खुनाचा गुन्हा दाखल
रविवारी सकाळी अरिंदम दुसऱ्या माळ्यावरून खाली आला. आपले वडील आणि भावाला सांगितले की त्याने पत्नीचा खून केला आहे. त्यानंतर ठाण्यात जाऊन त्याने आत्मसमर्पण केले. पोलीस घटनास्थळी पोहचली. त्यांनी मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवले. खुनाचा गुन्हा दाखल केला.
दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, पत्नी कधी साथ देत नव्हती. रत्नामा या होमिओपॅथी डॉक्टर होत्या. त्यांचे अरिंदम यांच्याशी प्रेम होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते.
प्रेमसंबंधानंतर केले होते लग्न
रत्नामा आपल्या पतीशी वाद होत असल्याने माहेरी गेली होती. शनिवारी रात्री अरिंदम पत्नीसह घरी आला. दुसऱ्या माळ्यावर दोघेही गेले. त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या का केली हे पोलीस अरिंदमला विचारत आहेत.
पती-पत्नीमधील वादाची ही आजची तिसरी घटना आहे. पहिली घटना हैदराबाद येथे घडली. पती पत्नीच्या वादातून पतीने आपल्या ९ वर्षीय मुलीला संपवले. दुसरी घटना ही मध्य प्रदेशात घडली. पत्नी माहेरी जात असल्याने पतीने थेट गोळीबार केला. यात तीन जण ठार झाले. आणि तिसऱ्या घटनेत, डॉक्टर पतीने पत्नीला ठार केली.