धारदार शस्त्राने पत्नीवर वार, पहिल्यांदा बायकोला संपवलं नंतर दारुड्याचा झाडाला गळफास!

कौटुंबिक वादातून दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नांदेडच्या नायगाव तालुक्यात घडली आहे. (After killing Wife husband Commits Suicide in nanded Naigaon)

धारदार शस्त्राने पत्नीवर वार, पहिल्यांदा बायकोला संपवलं नंतर दारुड्याचा झाडाला गळफास!
पहिल्यांदा बायकोला संपवलं नंतर दारुड्याचा झाडाला गळफास
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:35 AM

नांदेड :  कौटुंबिक वादातून दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल येथे घडली. सदर प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन मयत वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (After killing Wife husband Commits Suicide in nanded Naigaon)

नायगाव हे तालुक्याचं गाव… तिथून 15 कि.मी अंतरावर असलेल्या नरंगल येथे शुक्रवारी सकाळी पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत चांगलीच खळबळ उडाली. सदरच्या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रामराव पडवळ व उपनिरीक्षक बाचावार हे फौजफाट्यासह नरंगल येथे पोहचले. त्यांनी घटनेची सगळी स्थिती जाणून घेतली.

पत्नी शेतात एकटीच हे पाहून डाव साधला…

मुकींद भुजंग पट्टेकर हा दारुच्या नशेत नेहमीच पत्नीला मारहाण करुन भांडण करत होता. गुरुवारी रात्रीही शेतीच्या वादातून पत्नी रेणूकाबाई सोबत वाद झाला. पण हा वाद नेहमीचाच असल्याने रेणूकाबाई ही शुक्रवारी सकाळी शेतात असलेल्या जणावराचे दुध काढण्यासाठी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान शेताकडे गेली होती. पत्नी शेतात गेली असल्याची संधी साधून तो ही पत्नीच्या मागेच शेतात गेला आणि धारधार शस्त्राने पत्नीचा शेतातच खून केला.

दारुड्याची आत्महत्या

पत्नी जाग्यावरच मृत्यू पावल्यानंतर त्याने दुसऱ्याच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गावात समजताच अनेकजण घटनास्थळी धाव घेतली होती. तर काहींना या घटनेबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक रामराव पडवळ यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन दोघांचेही शव विच्छेदनासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.

(After killing Wife husband Commits Suicide in nanded Naigaon)

हे ही वाचा :

रात्री मित्रांबरोबर दारु पार्टी, सकाळी बलात्काराचा आरोप करुन तरुणीची आत्महत्या!

VIDEO: मुंबईत मुलीने धोका दिल्याचं सांगत डोक्याला बंदुक लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.