AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime | कल्याणमध्ये कोयता गॅग? बस चालकावर हल्ला, परिसरात तणाव

कल्याणमध्ये रात्री साडे आठच्या सुमारास एक थरारक घटना घडली. रामबाग परिसरात हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाने एसटीबस सह केडीएमसी बसच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Kalyan Crime | कल्याणमध्ये कोयता गॅग? बस चालकावर हल्ला, परिसरात तणाव
Image Credit source: प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Aug 31, 2023 | 10:35 PM
Share

कल्याण : 31 ऑगस्ट 2023 | पुणे आणि नाशिकमध्ये कोयता गॅगने धुमाकूळ घातला आहे. या गॅगला रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पुणेकर आणि नाशिककर या गॅगच्या दह्शतीखाली वावरत आहेत. अशातच ही दोन्ही शहरे जवळ असणाऱ्या कल्याण येथेही कोयत गॅगचे सावट पसरल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण परिसरात कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कल्याण पश्चिम येथील रामबाग हा परिसर अत्यंत गजबजलेला आणि रहदारीचा रस्ता आहे. कल्याण स्टेशनला लागून असलेल्या रामबाग परिसरात अनेक दुकाने आहेत. येते स्वस्त दरात वस्तू मिळत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. याच रामबाग परिसरात ही घटना घडली.

मागील काही दिवसापासून रामबाग परिसरात कोयता हातात घेऊन एक तरुणाने दहशत माजवली आहे. आज या तरुणाने संतोषीमाता रोडने जाणाऱ्या एसटी आणि केडीएमसीच्या बसेसच्या काचा फोडल्या. केडीएमसीच्या बस चालकाने धाडस दाखवून त्या तरुणाला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले.

कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडने मुरबाड रोडकडे जात असलेल्या एका एसटी बस सह केडीएमसीच्या बसच्या काचांवर त्या तरुणाने अचानक कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्याला अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बस वाहकावर त्या तरुणाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी बस चालकाने धाडस दाखवले आणि त्याला कोयत्यासह पकडले. ही घटना रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास संतोषी माता रोडवरील मधुरिमा चौकात घडली. या घटनेमुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण माथेफिरू आहे. मागील पंधरा दिवसापासून तो आपल्या पत्नीला मारण्यासाठी हातात कोयता घेऊन परिसरात वावरत होता. याची माहिती पोलिसांना देनाय्त आली होती. मात्र दरवेळी तो पोलिसांच्या हातावर तरी देऊन पसार हित असे. अखेर त्या बस चालकामुळे त्याला पकडण्यात आले. ज्यावेळी या तरुणाने बसवर हल्ला केला त्यावेळी तो नशेमध्ये होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.