प्रेमातील वाद चांगलाच पेटला, गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांनी घरी बोलावून सरळ त्याचे ओठच..
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या वादात तिच्या घरच्यांनी उडी घेतली आणि त्या मुलाला सरळ घरी बोलावून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
कलकत्ता | 29 जुलै 2023 : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर (dispute) मुलीच्या कुटुंबियांनी त्या भांडणात उडी घेतली आणि बॉयफ्रेंडला घरी बोलावून त्याला बेदम मारहाण (beat boyfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर कुटुंबियांनी धारदार शस्त्राने त्या मुलाचे ओठही कापल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी युवकाला बोलपूर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याच्या उपचारांत हलगर्जीपणा होत आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनुल हा तरूण बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काशीपूर गावचा रहिवासी आहे. त्याच गावातील रहिवासी बोजो खान यांच्या मुलीसोबततो 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्याने नात्यात कटुता आली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी हे भांडण मिटवण्यासाठी मोमिनुल याला त्यांच्या घरी बोलावले होते.
घरी बोलावून केली मारहाण, ओठही कापले
मोमिनुल घरी आल्यावर तो व तरूणी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काही कारणामुळे दोन्ही बाजूंकजून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. हळूहळू या भांडणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले. आणि एका क्षणी प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्या तरूणावर हल्ला करत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्याला बेदम मारहाण करण्यात आली तसेच एका धारदार शस्त्राने त्याचे ओठही कापण्यात आले, असा आरोप लावण्यात आला आहे. यामुळे गंभीर जखमी झालेला युवक रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरी पोहोचला. त्याला अशा अवस्थेत पाहून घरचे सुन्न झाले अन् त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठ रुग्णालयात दाखल केले.
तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोमिनुल याला बोलपूर उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी ही घटना घडली, मात्र रुग्णालयातील कर्मचारी निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप करत शुक्रवारी नातेवाईकांनी आंदोलन केले. त्याच्यावर नीट उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी लावला आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे