Kolhapur Loot : लातूरच्या ट्रक चालकाला आजऱ्यात लुटले, हातपाय बांधून जंगलात फेकले, चोरटे ट्रकसह फरार

बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कणकवलीच्या पुढे येऊन ट्रकच्या पुढे गाडी आडवी लावली. दरवाजा उघड नाहीतर काच फोडणार अशी धमकी दिल्यामुळे त्याने ट्रकचा दरवाजा उघडला. त्यानंतर गाडीतील दोन तरुण ट्रकमध्ये बसले.

Kolhapur Loot : लातूरच्या ट्रक चालकाला आजऱ्यात लुटले, हातपाय बांधून जंगलात फेकले, चोरटे ट्रकसह फरार
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:54 PM

कोल्हापूर : लातूरच्या ट्रक चालकाला आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात चार तरुणांनी लुटल्या (Loot)ची घटना घडली आहे. मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास आजरा आंबोली रस्त्यावरील जंगल क्षेत्रात ही घटना घडली आहे. लुटल्यानंतर आरोपींनी चालकाला हात पाय बांधून जंगलात फेकले. त्यानंतर ट्रक (Truck) घेऊन फरार (Absconded) झाले. अशोक अर्जुन पवार असे लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे ट्रक चालकला मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी आणि ट्रकचा शोध घेत आहेत. मात्र अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ट्रक चालकाला बांधून जंगलात फेकले

लातूर येथील अशोक पवार हे आपल्या ताब्यातील भारत बेंज ट्रक घेऊन चालले होते. बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कणकवलीच्या पुढे येऊन ट्रकच्या पुढे गाडी आडवी लावली. दरवाजा उघड नाहीतर काच फोडणार अशी धमकी दिल्यामुळे त्याने ट्रकचा दरवाजा उघडला. त्यानंतर गाडीतील दोन तरुण ट्रकमध्ये बसले. या तरुणांनी त्याला सावंतवाडीपर्यंत आणले. त्या ठिकाणी त्याच्या ताब्यातील ट्रक काढून घेऊन त्याला बोलेरो गाडीत घातले. तेथून ते आजऱ्याकडे आले. आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात हात, पाय, तोंड बांधून त्याला टाकले आणि फरार झाले. रात्रभर पावसात भिजल्याने अशोक भेदरला आहे.

पुणे-बंगलोर महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

पुणे-बंगलोर महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. या टोळीमध्ये चार आरोपींचा समावेश आहे. चौघांकडून 11 गुन्ह्यांची उकल झाली असून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहित मोरे, गंगाराम गावडा, अक्षय सोनवणे आणि शुभम सातपुते अशी अटक केलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. हे आरोपी चाकू आणि जंबियाचा धाक दाखवून प्रवाशांची लूटमार करत होते. (After robbing the truck driver in Kolhapur, the accused absconded with the truck)

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.