Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयकर विभागाची बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई, धाबे दणाणले मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, गौडबंगाल काय?

सलग सहा दिवस आयकर विभागाने नाशिक मधील बांधकाम व्यावसायिकांची चौकशी केल्यानंतर आता राजकीय व्यक्तींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयकर विभागाची बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई, धाबे दणाणले मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, गौडबंगाल काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 2:45 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील जवळपास 15 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. तब्बल सहा दिवस केलेल्या छापेमारीत मोठे घबाड हाती लागले आहेत. हजारो कोटी रुपयांचं घबाड आयकर विभागाच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 90 हून अधिक वाहनांचा ताफा राज्यातील विविध भागातून नाशिकमध्ये पहाटेच्या वेळेला दाखल झाला होता. कुणाच्या घरी तर कुणाच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अडीचशेहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी छापेमारी केली होती. या कारवाईनंतर खरंतर बांधकाम व्यावसायिकांच्या मध्ये खळबळ उडाली होती. करचुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यानंतर आता प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

ज्या बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली त्या बांधकाम व्यावसायिकांचे अनेक राजकीय व्यक्तींशी आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी या बांधकाम व्यावसायिकांकडे गुंतवणूक केली आहे.

खरंतर यामध्ये अनेक क्लास वन अधिकारी आणि क्लास टु दर्जाच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची कायदेशीर चौकशी होण्याची शक्यता आहे. असे असतांना काही राजकीय व्यक्तींची देखील यामध्ये भागीदारी असल्याचं बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक शहरात झालेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या चौकशीनंतर शासकीय अधिकारी, राजकीय व्यक्ती, छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासह ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांचे धाबे दणाणले असून कारवाई होईल की नाही याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक शहरात अनेक अधिकारी नोकरीच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी भविष्यकाळात थंड हवेच्या ठिकाणी राहता येईल या अनुषंगाने गुंतवणूक केल्याचे बोलले जात होते. तर काहींनी निवृत्ती नंतर इथेच आयुष्य घालवायचे म्हणून गुंतवणूक केली आहे.

त्यामुळे पुढील चौकशीच्या टप्प्यात कोणाचा नंबर लागतो ? कोणते अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर येतात या बाबत नाशिक शहरात दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.