मानव जातीला काळिमा फसणारी घटना, सातत्याने अशा घटना समोर येत असल्यान संतापाचे वातावरण
नाशिक : अजूनही समाजात स्री जातीचे बाळ जन्माला आल्यानंतर ते नकोसे वाटते आहे. त्याचे उदाहरण अनेकदा समोर येत आहे. नाशिकमध्ये सातत्याने स्री जातीचे अर्भक फेकल्याच्या घटना समोर येत आहे. नुकतेच अंबड परिसरात ही संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पंडित कॉलनी परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. कचऱ्याच्या […]
नाशिक : अजूनही समाजात स्री जातीचे बाळ जन्माला आल्यानंतर ते नकोसे वाटते आहे. त्याचे उदाहरण अनेकदा समोर येत आहे. नाशिकमध्ये सातत्याने स्री जातीचे अर्भक फेकल्याच्या घटना समोर येत आहे. नुकतेच अंबड परिसरात ही संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पंडित कॉलनी परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. कचऱ्याच्या डेपोत प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत स्री जातीचे अर्भक फेकून दिले होते. त्यामध्ये चौकशी केली असता पंडित कॉलनी परिसरातून येणाऱ्या घंटागाडीतून ते अर्भक आले असावे असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र, ही घटना ताजी असतांनाच नाशिकच्या अंबड परिसरात स्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. अंबडच्या अंबिका नगर परिसरातील चुंचाळे शिवारात एक अर्भक अज्ञात व्यक्तीने फेकून दिले होते. मात्र, काही तासातच हे काही तासांचे अर्भक कुत्र्यांच्या तावडीत सापडले गेले. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचा अनेक ठिकाणी चावा घेत लचके तोडले आहे.
नाशिकच्या अंबड परिसरात स्री जातीचे अर्भक आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्री जातीचा अजूनही तिरस्कार केला जातो ही दुर्दैवाची बाब आहे.
मनुष्य जातीला काळिमा फासणाऱ्या या घटना वारंवार घडत असल्याने नाशिकमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर कारवाईची मागणी केली जात आहे.
अंबडच्या शिवारात ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना ही बाब कळवली, त्यानंतर पोलीसांनीही तात्काळ धाव घेत पंचनामा केला आहे.
28 नोव्हेंबरच्या मध्यरात्री स्री जातीचे हे अर्भक फेकण्यात आलेचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे, यामध्ये कुत्र्यांच्या तावडीत हे अर्भक सापडल्याने त्याच्या शरीराचा अनेक भाग तोडला गेला आहे.
संपूर्ण शरीरावर कुत्र्यांनी चावा घेतल्याने शरीरातून रक्तस्राव सुरू होता. मृत अवस्थेत आढळून आलेले अर्भक पाहून पोलीस आणि नागरिक हळहळ व्यक्त करत होते.