हातातला घट्ट मोबाईल उलगडणार खूनाचं रहस्य? इचलकरंजीची घटना पोलिसांसाठी आव्हान
एका शेतमजूर महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Agricultural labor Women Murder in Ichalkaranji Shirdhon)
कोल्हापूर : एका शेतमजूर महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इचलकरंजीतील शिरोळ तालुक्यातील शिरढोणमध्ये ही घटना घडली आहे. शोभा सदाशिव खोत असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा खून नेमका का केला, याचे अद्याप कारण समोर आलेले नाही. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. (Agricultural labor Women Murder in Ichalkaranji Shirdhon)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मृत महिला खोत या गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राजू मोरडे यांच्या शेतात शेतमजूरीसाठी गेली होती. काल दुपारी तीनच्या सुमारास शेतमजुरीचे काम आटपून चाऱ्याचे गाठोडे घेऊन ती घराकडे परतत होती. मात्र त्यावेळी अचानक किशोर मानगावे यांच्या शेतामध्ये या महिलेच्या मानेवर पाठीमागून धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना चाऱ्याचा गाठोडे पडलेले सापडले. तर तिच्या एका हातामध्ये मोबाईल घट्ट पकडलेला सापडला. तसेच आजूबाजूला खुनासाठी वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध घेण्यात आला, मात्र या ठिकाणी काहीही आढळून आले नाही. गावातील इतर महिला मजुरी करुन परतत असताना ही खुनाची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी गर्दी केली.
दरम्यान या मृत महिलेच्या पश्चात मुलगा आणि विवाहित मुलगी आहे. या महिलेचा खून कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या महिलेच्या हातातील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलवरुन आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य होईल, असे बोलले जात आहे. (Agricultural labor Women Murder in Ichalkaranji Shirdhon)
संबंधित बातम्या :
जनावरांच्या चाऱ्यातून दारूची तस्करी, चंद्रपूरमध्ये 37 लाख रुपयांचा माल जप्त