Ahmadnagar News : एवढी मोठी लाच कुणीच मागितली नसेल, रक्कम ऐकून चक्रावून जाल, महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. छापा टाकून लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Ahmadnagar News : एवढी मोठी लाच कुणीच मागितली नसेल, रक्कम ऐकून चक्रावून जाल, महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 9:47 AM

कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अहमदनगर | 4 नोव्हेंबर 2023 : लाच मागणं (bribe) हा सर्वात मोठा गुन्हा आहे. मात्र तरीही लोकांची काम करून देण्यासाठी अनेक जण लाच मागत असतात.अशाच एका कामासाठी मोठ्या रकमेची लाच मागून (bribe case) स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच दणका बसला आहे. अहमदनगर मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने ही कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. त्याने तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

अशी केली कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या इसमाला औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाचे तब्बल 2 कोटी रुपयांचे बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताची सही घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्या अधिकाऱ्याविरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नगरमध्ये दाखल झाले. नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ छापा मारला आणि लाचखोर सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.