नियतीने एकत्रच गाठलंं, बायकोला वाचवताना नवराही बुडाला, नगरमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा करुण अंत

शेत तळ्यात बुडून नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवाहिता तळ्यातील पाण्यात बुडत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीलाही प्राण गमवावे लागले.

नियतीने एकत्रच गाठलंं, बायकोला वाचवताना नवराही बुडाला, नगरमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा करुण अंत
अहमदनगरमध्ये नवदाम्पत्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 11:42 AM

अहमदनगर : नवविवाहित दाम्पत्याचा अपघाती मृत्यू (Newly married couple death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेत तळ्यात बुडून पती-पत्नी अशा दोघांचाही करुण अंत झाला. विवाहिता तळ्यातील पाण्यात बुडत होती, यावेळी तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही बुडून मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथे ही मन हेलावणारी घटना घडली. काल (मंगळवार) रात्री आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पूजा निलेश शिंदे (वय 22 वर्ष) आणि निलेश रावसाहेब शिंदे (वय 27 वर्ष) असं या दुर्दैवी घटनेत प्राण गमवावे लागलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पूजा आणि निलेश यांचे अवघ्या एका वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून दोघांच्याही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय आहे प्रकरण?

शेत तळ्यात बुडून नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवाहिता तळ्यातील पाण्यात बुडत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीलाही प्राण गमवावे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे सर्वाच्या काळजात कालवाकालव झाली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

22 वर्षीय पूजा निलेश शिंदे आणि 27 वर्षीय निलेश रावसाहेब शिंदे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. पूजा आणि निलेश यांचे अवघ्या एका वर्षापूर्वीच लग्न झाले होते.

कुटुंबावर शोककळा

रात्री उशिरा ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे आंचलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पूजा आणि निलेश या दोघांचेही कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.

संबंधित बातम्या :

लग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.