अहमदनगरच्या व्यावसायिकाला फेसबूकवरील मैत्री महागात, तब्बल 14 लाखांना बसला गंडा

अहमदनगरच्या एका व्यावसायिकाची फेसबूकवर झालेल्या मैत्रीतून 14 लाखांची फसवणूक झाली आहे. Ahmednagar Cyber Police

अहमदनगरच्या व्यावसायिकाला फेसबूकवरील मैत्री महागात, तब्बल 14 लाखांना बसला गंडा
अहमदनगर सायबर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 7:05 PM

अहमदनगर : गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अहमदनगरच्या एका व्यावसायिकाची फेसबूकवर झालेल्या मैत्रीतून 14 लाखांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अहमदनगरच्या पोलिसांनी 3 नायजेरियन आरोपी आणि एका भारतीय आरोपीला अटक केली असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. पोलीस अधिकारी मधुकर साळवे यांनी ही माहिती दिली. (Ahmednagar Cyber Police arrested four persons for online fraud )

अशी झाली फसवणूक

अहमदनगरच्या एका व्यावसायिकासोबत एका परदेशी नागरिकाने फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर त्यानं व्यावसायिकाची फसणूक केली. संबंधित व्यावसायिकांनं तब्बल 14 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातला गेल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणी 3 नायजेरियन आणि 1 भारतीय आरोपींना अटक केली.

संबंधित आरोपीनं व्यावसायिकाला एका हर्बल प्रोडक्ट कंपनीला आर्युवेदिक कच्चा माल विकण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा कच्चा माल कमी किमतीत खरेदी करून लाखो रुपयांचा फायदा होत असल्याचं व्यावसायिकाला सांगितलं. व्यावसायिकाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याची तब्बल 14 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यवसायिकानं सायबर पोलिसात जाऊन तक्रार केली.

Ahmednagar cyber crime 01

सायबर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल

सायबर पोलिसांकडून तातडीनं तपास

व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत तीन नायजेरीयन पुरुष आणि एक भारतीय महिलेला जेरबंद केले. या आरोपींकडून 1 लॅपटॉप, 10 मोबाईल फोन, विविध बँकांचे 5 पासबुक, 5 चेक बुक आणि 7 ATM कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधिकारी मधुकर साळवे यांनी नागरिकांनी फेसबवूकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये असं आवाहन केलं आहे. अनोळखी व्यक्तींशी कोणताही व्यवहार करु नये, असंही आवाहन त्यांनी केलंय.

संबंधित बातम्या:

नागपूरचा बाबा, लंडनची मैत्रिण, फेसबुकवर मैत्री, थेट खिशाला कात्री !

सख्खे भाऊ पक्के दरोडेखोर, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

(Ahmednagar Cyber Police arrested four persons for online fraud )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.