Video | अहमदनगरमध्ये टोळीयुद्ध, तुफान राड्यात 8 जण गंभीर जखमी, गाड्यांचीही तोडफोड

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात अजंठा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे. (ahmednagar two groups fight)

Video | अहमदनगरमध्ये टोळीयुद्ध, तुफान राड्यात 8 जण गंभीर जखमी, गाड्यांचीही तोडफोड
AHMEDNAGAR FLIGHT
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 11:49 PM

अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी शहरात अजंठा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे. या राड्यामध्ये तब्बल सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या जखमींवर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय तसेच अहमदनगरमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे पाथर्डी शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे. (Ahmednagar fight between two groups 8 people injured)

दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. ही हाणामारी एवढी गंभीर होती की यामध्ये एकूण सात ते आठ जण जबर जखमी झाले आहेत. यातील काही जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच, गंभीर जखमी झालेल्यांना अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

गाड्यांची तोडफोड, लाखोंचे नुकसान

दोन गटांत झालेल्या टोकाच्या भांडणाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, दोन्ही गटांतली लोकांनी दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली आहे. टोळीतील लोकांनी गाड्यांची केलेली तोडफोड व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. गाड्यांची तोडफोड केल्यामुळे या हाणामारीत लोखोंचे नुकसान झाले आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, ही घटना घडताच बाजूच्या लोकांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीसुद्धा घटनास्थळी दाखल होत परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, या गंभीर प्रकारामुळे पाथर्डी शहरात सध्या तणावाचे वातवरण आहे.

इतर बातम्या :

Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच

लहान मुलांना कोरोना पाठोपाठ ‘एमआयएस-सी’चाही धोका; जाणून घ्या नेमकी काय आहे चिंता

Video | गाढव-मुलीचं अतूट नातं, हंबरडा पाहून नेटकरी भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Ahmednagar fight between two groups 8 people injured)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.