तलाठी भरती परीक्षेत बनवाबनवी, सीसीटीव्ही तपासात 11 डमी सापडले, अहमदनगरमध्ये गुन्हा

अहमदनगर जिल्ह्यातील 84 तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत 2 ते 26 जुलै 2019 दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती (Ahmednagar Talathi Recruitment Exam Dummy )

तलाठी भरती परीक्षेत बनवाबनवी, सीसीटीव्ही तपासात 11 डमी सापडले, अहमदनगरमध्ये गुन्हा
SET Exam 2021
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 11:33 AM

अहमदनगर : अहमदनगरमधील तलाठी भरती परीक्षेतील 11 डमींवर अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षापूर्वी झालेल्या तलाठी भरती परीक्षेला बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी विद्यार्थी बसले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात 11 उमेदवार डमी आढळले. (Ahmednagar Talathi Recruitment Exam Scam Dummy Candidate)

अहमदनगर जिल्ह्यातील 84 तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत 2 ते 26 जुलै 2019 दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. तर उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन दिली. त्यानंतर 23 डिसेंबर 2019 रोजी 125 जणांची प्रारुप यादी प्रशासनाने जाहीर केली.

फोटो आणि प्रत्यक्ष उमेदवारांबाबत संशय

त्या उमेदवारांना 3 ते 7 जानेवारीदरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात 11 तोतया उमेदवार आढळले.

संशय कसा बळावला?

अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांमध्ये गडबड झाल्याचा संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यावर त्यांनी 236 उमेदवारांचे सीसीटीव्ही फूटेज मागवले. तेही त्यांना महाआयटीकडून पूर्ण मिळाले नाहीत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सह्या जुळत नाहीत, एका मुलीच्या नावासमोर पुरूष असे लिहिले होते. नंतर तिने ही चूक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले, यासारख्या बाबी त्यांना आढळल्या. हा घोटाळा मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्याशी साधर्म्य दाखवणारा असल्याचे बोललं जातं.

MPSC पूर्वपरीक्षेची नवी तारीख जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: MPSC परीक्षा 21 मार्चला होणार

आता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना टीईटी शिक्षकांनी शिकवणे बंधनकारक

(Ahmednagar Talathi Recruitment Exam Scam Dummy Candidate)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.