Video: अर्रsss! गप्पागोष्टी करत मैत्रिणी निघाल्या, एकीला कारने उडवलं, दोघी थोडक्यात वाचल्या

Akola Accident News : तिघींपैकी एक तरुणी पुढे गेली. तिला नेमकं घडलं काय हेच कळू शकलं नाही.

Video: अर्रsss! गप्पागोष्टी करत मैत्रिणी निघाल्या, एकीला कारने उडवलं, दोघी थोडक्यात वाचल्या
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:10 AM

अकोला : अंगावर काटा आणणारं भीषण अपघाताचं एक सीसीटीव्ही (Accident CCTV Video) फुटेज समोर आलंय. एका भरधाव कार तरुणींना चिरडते. रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणींच्या घोळक्याला समोरुन येऊन धडकणारी ही कार (Akola Accident News) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातानं उपस्थितांच्याही अंगावर काटा आणला होता. अकोला जिल्ह्यातल्या अकोट (Akot Car Accident Video) शहरात ही घटना घडली. या अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कारनं फक्त तरुणींना नव्हे तर काही दुचाकींनाही चिरडलंय. पाच दुचाकींना धडक दिल्यानंतर ही भरधाव कार थेट तरुणींच्या अंगावर आली. स्वतःचा बचाव करण्याचाही वेळ या अपघातामध्ये तरुणींना मिळाला नाही. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरु आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालंय.

हा अपघात अकोट शहरातील वर्दळीच्या ठिकणी घडला. नरसिंग मार्गावर एक कार भरधाव वेगानं आळी. रस्त्यानं पाणी जाणाऱ्या युवतींना या कारनं अक्षरशः चिरडलं. यातील एक तरुणीला तर थेट गाडीच्या बोनेटचा जोरदार धक्का बसला. ही तरणी रस्त्यावर वेगानं फेकली गेल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसून आलंय. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ : ही दृश्य तुम्हाला विचलीत करु शकतात

हे सुद्धा वाचा

या भीषण अपघातात कारने आधी दुचाकींना धडक दिली. त्या पाच दुकाकींचं मोठं नुकसान झालंय. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती दुकाना बाहेर एकमेकांशी बोलताना दिसतात. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक रिक्षा पास होताना दिसते. त्यानंतर पाठीवर दप्तर घेऊन स्कार्फ बांधून निघालेल्या तीन तरुण रस्त्यावरुन चालताना दिसता. एक गाडी आपल्या दिशेने येतेय हे पाहून तिघींपैकी एक रस्त्याच्या कडेनं जाणारी तरुणी आपल्या दोन मैत्रिणींचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. त्या दोघांनीही ती आतल्या बाजूला ढकलते. पण गाडीची धडक थेट या तरुणीलाच बसते. ही तरुणी कारच्या बोनेटवरुन रस्त्यावर दूर फेकली जाते. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

यानंतर तिघींपैकी एक तरुणी पुढे गेली. तिला नेमकं घडलं काय हेच कळू शकलं नाही. तर मधून चालणाऱ्या तरुणीला मोठा धक्का बसला. जोरात तिनं ओरडून मागे पाहिलं आणि ती मैत्रिणीच्या मदतीला धावल्याचं दिसून आलंय. यानंतर रस्त्यावर सगळ्यांनी मदतीसाठी जखमी मुलीच्या दिशेनं धाव घेतली.

चालकाला अटक

कार चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरधाव आणि बेजबाबदारपणे वाहन चालवण्यासोबत अन्य गुन्हे चालकविरोधात दाखल करण्यात आले असून सध्या कार चालकावर कारवाई केली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.