चाकूचा धाक दाखवून गोपालला लुटायचा प्लान होता, प्लान फसला! गोपालनेच एकाला भोसकलं
3 जानेवारीला संजीव जाधव याचा मृतदेह अंबाशी फाटा परिसरातील एका शेतात आढळला होता. धारदार शस्त्रानं वार करुन त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होताच. हा संशय खराही ठरलाय.
अकोला : चिखली तालुक्यात कारमध्ये झालेल्या एका हत्येच्या संशयानं अनेक सवाल उपस्थित केले होते. दरम्यान, याबाबत अखेर छडा लागला असून लुटायला आलेल्यांचीच हत्या झाल्याचं अखेर समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून इतरांचीही चौकशी सुरु आहे.
नेमकं काय घडलं होतं?
घटना आहे 2 जानेवारीची. गोपाल लव्हाळे यांच्याकडे असलेली कार ते भाड्याने देत असल्याची माहिती दोघांना मिळाली. संजीव जाधव आणि भारत वीससिद या दोघांनी गोपाल लव्हाळे यांची गाडी भाड्यानं आणून संजीव आणि भारत यांनी त्यांना चिखलीला आणलं. अंबाशी फाटा इथं पोहोचल्यानंतर संजीव आणि भारत गाडीत बसले.
गाडीत बसल्यानंतर त्यांची नजर गोपाल यांच्याकडे असलेल्या अंगठी आणि चेनवर पडली. शौचाला जाण्याचा बहाणा करत त्यांनी गोपाल यांना गाडी थांबवण्यास सांगितली गोपालच्या अंगावरील दागिने धारदार चाकूचा धाक दाखवत हिसकावण्याचा प्रयत्नही संजीव आणि भारतनं केला. यावेळी गाडीत झालेल्या झटापटीमध्ये गोपालने भारतच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. इतकंच काय तर झटापतीमध्ये संजयवर वारही केले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या संजीववा पाहून भारतही धास्तावला. जे घडलं, त्यानं प्रचंड हादरलेला भारत आणि मुख्य संशयित आरोपी गोपालेही घटनास्थळावरुन पळ काढला.
घटना उघडकीस कशी आली?
3 जानेवारीला संजीव जाधव याचा मृतदेह अंबाशी फाटा परिसरातील एका शेतात आढळला होता. धारदार शस्त्रानं वार करुन त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होताच. हा संशय खराही ठरलाय. मात्र हत्या कुणी केली, याचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, अखेर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर मुख्य संशयित आरोपी गोपल लव्हाळे यांनी खुनाची कबुली दिली असल्याचीही माहिती समोर आली आहे. गोपाल हा बुलडाणा तालुक्यातील सव इथला असून त्याच्याकडून इतरही माहिती गोळा करण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. तसंच भारत विससिद याला पोलिसांनी अटक केली आहे.