Crime : Boyfriend मालाडमध्ये दुसऱ्या मुलीसोबत दिसला, तिने व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्… धक्कादायक घटना समोर

BF GF News : प्रेम चांगलं की वाईट असा प्रश्न सर्वांनाच पडत असावा, मात्र प्रेम कसंही असो पण ते जीवघेणं नसावं. अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीच्या हातात घालून फिरताना दिसल्यावर तिने जे काही केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

Crime : Boyfriend मालाडमध्ये दुसऱ्या मुलीसोबत दिसला, तिने व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्... धक्कादायक घटना समोर
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 2:44 PM

मुंबई : सोशल मीडियावर ओळख त्यानंतर मैत्री, प्रेम आणि धोका अशी अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. पण काही प्रकरण ही एकतर्फी असतात, ज्यामध्ये एकाच खूप जास्त प्रेम असतं मात्र दुसऱ्या व्यक्तीला त्याचं जास्त काही फरक पडत नाही. एकतर्फी प्रेमी समोरील व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यात केव्हा काय याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशातच मुंबईमध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये किन्नरने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

नेमकं काय आहे प्रकरण?

आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतलेल्या किन्नरचं नाव अलवीना खान आहे. मुंबईतील मालवणी येथे ती वास्तव्यास होती. अलवीना हिचं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, मात्र काही दिवसांपूर्वी अलवीनाने त्या मुलाला दुसऱ्या मुलीसोबत मालाडमधील मढ येथे हातात हात फिरत असताना पाहिलं होतं. त्यानंतर अलवीनाने त्याला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो तिला भेटायचा नाही. त्याच्या अशा वागण्याने ती त्रासली होती. कारण अनेकवेळा अलवीनाने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिला काही वेळ देत नसायचा.

अलवीनाने शेवटी टोकाचा निर्णय घेतला, इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या अलवीनाने व्हिडीओ रेकॉर्ड करत गळफास घेत आपलं जीवन संपवलं. सध्या मालवणी पोलिसांनी अदर अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार अलवीनाचं संबंधित मुलावर एकतर्फी प्रेम होतं. या एकतर्फी प्रेमामुळे तिने आपलं जीवन संपवलं की काही दुसरं कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.