अंबरनाथमध्ये बुलेट राजांना पोलिसांचा दणका, 61 मॉडिफाइड सायलेन्सर जप्त

रॉयल एन्फिल्ड म्हणजेच बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर अंबरनाथ शहरात वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई करण्यात आली. Royal Enfield bikes modified silencer

अंबरनाथमध्ये बुलेट राजांना पोलिसांचा दणका, 61 मॉडिफाइड सायलेन्सर जप्त
अंबरनाथ पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:44 PM

अंबरनाथ : कल्याण आणि उल्हासनगर नंतर अंबरनाथमध्येही रॉयल एन्फिल्ड म्हणजे बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाईला सुरुवात करण्यात आलीये. एकाच दिवसात तब्बल 61 बुलेटचे सायलेन्सर कापून या कारवाईला जोरदार सुरुवात करण्यात आली. (Amabarnath Police seized modified silencer 61 of Royal Enfield bikes)

रॉयल एन्फिल्ड या दुचाकीला कंपनीने दिलेलं सायलेन्सर काढून अनेक जण मॉडिफाइड सायलेन्सर लावतात. या सालेन्सरमधून येणारा कानठळ्या बसवणारा आवाज हा अनेकांसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे मागील काही दिवसात कल्याण, उल्हासनगर आणि आता अंबरनाथ शहरात या सायलेन्सरविरोधात कारवाई सुरु करण्यात आली.

उल्हासनगरनंतर अंबरनाथमध्ये कारवाई

उल्हासनगरात 114 सायलेन्सरचा रोड रोलरखाली चक्काचूर केल्यानंतर अंबरनाथमध्ये वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरुवात केलीये. कारवाईच्या पहिल्याच दिवशी तब्बल 61 बुलेटचे सायलेन्सर वाहतूक विभागाने कापून जप्त केलेत.

अंबरनाथ शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आलीये. या कारवाईनंतर जप्त केलेल्या सायलेन्सरचा रोड रोलरखाली चक्काचूर केला जाईल. त्यामुळे अजूनही जर असे मॉडिफाइड सायलेन्सर कुणाच्या बुलेटला असतील, तर ते वेळीच बदलून घ्यावेत, असं आवाहन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी केलंय.

उल्हासनगरमध्ये भर चौकात 114 सायलेन्सरवर रोलर

उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी मागील काही दिवसात धडक कारवाई करत तब्बल 114 बुलेट गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले होते. या सर्व सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहे. उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या अतिशय गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर हे सायलेन्सर ठेवून त्यावरून रोलर फिरवण्यात आला. लोकांना ही कारवाई कळावी, यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण निवडण्यात आलं.

जे गॅरेज चालक असे सायलेन्सर लावून देतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. तर उल्हासनगरात शहर हे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणारं शहर असून या कारवाईनंतर आता तरी शहरातलं ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

पोलिसी खाक्या, भर शिवाजी चौकात बुलेटच्या 114 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवला, तरुणांना चांगलाच धडा

रॉयल एन्फिल्ड शोरूममधील चोरीचा छडा, सराईत चोरट्यालाखेर बेड्या

(Amabarnath Police seized modified silencer 61 of Royal Enfield bikes)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.