बदल्यासाठी झुरत होता, अखेर Amazon च्या सीनियर मॅनेजरच्या हत्येच कारण समोर
Amazon senior manager murder case : 18 वर्षाच्या मुलाच्या गँगने इतक्या अमानुषपणे हत्या का केली? ते कारण समोर आलय. महत्त्वाच म्हणजे हा आरोपी आणखी चार हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. नव्याने उदयाला येत असलेल्या माया गँगचा तो मोहरक्या आहे.
नवी दिल्ली : Amazon च्या सीनियर मॅनेजरची मंगळवारी रात्री अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. चार ते पाच सशस्त्र आरोपींनी अंदाधुंद गोळीबार केला. यात 36 वर्षाच्या हरप्रीत गिलचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. हरमनप्रीत सोबत असलेले त्याचे नातेवाईक गोविंद गोळीबारात जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी संध्याकाळी या भयानक गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून तो अवघ्या 18 वर्षांचा असल्याची चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
नव्याने उदयाला येत असलेल्या माया गँगचा तो मोहरक्या असून चार हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे. दिल्लीच्या भजनपुरा भागात मंगळवारी रात्री ही हत्या झाली होती. आरोपी गोळीबार करुन घटनास्थळावरुन पसार झाले होते. मुख्य आरोपीने, ही हत्या का केली? ते कारण सांगितलं. पोलिस, त्याने जे सांगितलय, ते खर आहे का? हे तपासून पाहत आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. हरप्रीत गिल आपल्या कुटुंबासोबत भजनपुरा भागात राहतो. ही घटना घडली त्यावेळी काका त्याच्यासोबत होते. गोविंद सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कानामागून गोळी डोक्यात घुसली
मुख्य आरोपीने हरमनप्रीतची इतक्या क्रूरपणे हत्या का केली? ते कारण सांगितलं. हरप्रीत गिलचा मागच्या महिन्यात आरोपीच्या साथीदारासोबत वाद झाला होता. त्यातून हरप्रीतने त्या मुलाच्या कानाखाली मारली होती. तोच राग मनात ठेऊन आरोपीने हरप्रीत गीलची गोळ्या झाडून हत्या केली. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांना रुग्णलयाकडून या गोळीबाराबद्दल समजल. हरप्रीतला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केलं. “कानामागून उजव्याबाजूने गोळी हरप्रीतच्या डोक्यात घुसली. दुसऱ्याबाजूने बाहेर पडली. गोविंद सिंह यांच्या सुद्धा डोक्यात गोळी लागली असून त्यांच्यावर लोकनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत” असं पोलिसांनी सांगितलं. कशी केली हत्या?
घटना घडली त्यावेळी सीनियर मॅनेजर हरप्रीत गिल मित्रासोबत बाइकवरुन चालला होता. तितक्यात मागून स्कुटीवरुन आरोपी आले. त्यांनी बाईकला ओव्हरटेक करुन थांबायला भाग पाडलं. त्यानंतर दणादण गोळ्या झाडून हरप्रीत गिलची हत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक घराच्या बाहेर आले. त्यांना हरप्रीत घराच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्या पडलेला दिसला. दुसरा व्यक्ती गंभीर जखमी होता. तो मदतीसाठी याचना करत होता.