Ambergris : अंबरग्रीस विकल्यानंतर इडली विक्रेत्याला मिळणार होते 50 लाख कमिशन, 5 कोटीचं अंबरग्रीस पोलिसांच्या ताब्यात
आम्ही तुम्हाला सांगतो की समुद्रातील व्हेल माशांच्या उलट्यांमधून अॅम्बरग्रीस हा पदार्थ बाहेर पडतो. ज्याचा वापर महागडे परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने आणि महागडी औषधे बनवण्यासाठी केला जातो.
मुंबई – मुंबई (Mumbai) आरे कॉलनी रॉयल पाम परिसरात विक्रीसाठी आणलेल्या अंबरग्रीस (Ambergris) पदार्थासह मुंबईच्या आरे पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला अटक केली आहे. जप्त केलेल्या अंबर ग्रीसची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा वसई परिसरातील रहिवासी आहे. तो इडली सांबर विक्रेता आहे. मात्र रातोरात करोडपती होण्याच्या लालसेमुळे त्याला पोलिसांच्या कोठडीत जावे लागले आहे. हा पदार्थ विकून आरोपी 50 लाख कमिशन घेणार होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं
एका रात्रीत करोडपती होण्याच्या लालसेपोटी एका इडली विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव शेडू रमण श्रीनिवासन असं आहे. हा वसई येथे राहून इडली सांबार विकायचा. पण त्याला कोणीतरी सांगितले की,अमरग्रीस विकण्याचे काम केले. तर तो रातोरात करोडपती होऊ शकतो. बेकायदेशीर अमरग्रीस मागवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तो येथे आला होता. आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात आरे कॉलनीतील पोलिस आरोपी शेडू येण्याची वाट पाहत थांबले होते. 27 एप्रिल रोजी दुपारी शेडू एका पिशवीत अंबरग्रीस घेऊन आला असता पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी शेडूकडून 2 किलो ताजे अंबर ग्रीस हस्तगत केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. सध्या आरे पोलीस आरोपी शेडूला अंबर ग्रीस पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
अंबरग्रीस खरेदी विक्रीला बंदी
आम्ही तुम्हाला सांगतो की समुद्रातील व्हेल माशांच्या उलट्यांमधून अॅम्बरग्रीस हा पदार्थ बाहेर पडतो. ज्याचा वापर महागडे परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने आणि महागडी औषधे बनवण्यासाठी केला जातो. आपल्या देशात आणि परदेशात त्याची विक्री करणे आणि खरेदी करणे बेकायदेशीर मानले जाते, परंतु असे असतानाही लाखोंच्या लोभापायी लोक व्यवसाय करतात अशी माहिती डीसीपी सोमनाथ घारगे यांनी दिली.