रस्त्यात वाद सुरु होता, पार्किंग कर्मचारी पहायला गेले; मग कर्मचाऱ्यांनाच…

अंबरनाथच्या पे अँड पार्कमध्ये शुक्रवारी मध्यरात्री रिक्षाचालक आणि फेरीवाले घुसले. यावेळी काही कारणावरुन वाद झाला. या वादातून पुढे जे घडले ते फार भयानक होते.

रस्त्यात वाद सुरु होता, पार्किंग कर्मचारी पहायला गेले; मग कर्मचाऱ्यांनाच...
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरणImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 12:56 PM

अंबरनाथ / निनाद करमरकर : किरकोळ वादातून पालिकेच्या पार्किंगमध्ये फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी पार्किंग कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या पे अँड पार्कमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पार्किंग कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अंबरनाथ चौकातील पे अँड पार्कमध्ये घडली घटना

अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबरनाथ पालिकेचं पे अँड पार्क आहे. या पार्किंगमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काही रिक्षाचालक आणि फेरीवाले घुसले. त्यांनी पार्किंग कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण सुरू केली. अक्षरशः मोठ्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या डोक्यात मारण्यात आल्या.

पार्किंगच्या बाहेर झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पार्किंग कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रवासी बसवण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि शहर बसचालकामध्ये मारहाण

शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच एका रिक्षा चालकाचा आणि शहर बस चालक यांच्यात मारामारीची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील ही घटना आहे. अखेर कार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रिक्षा चालकाला आणि बस चालकाला ताब्यात घेण्यात आले. रस्त्यावर काही काळ ट्रॅफिक जमा झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक सुरळीत केली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.