रंगकामासाठी बोलावून टाकीसफाई, अंबरनाथमध्ये श्वास गुदमरुन तिघा कामगारांचा मृत्यू

कलरच्या कामासाठी बोलावून तिघा कामगारांना केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवल्याचा आरोप केला जात आहे. (Ambernath workers died suffocating )

रंगकामासाठी बोलावून टाकीसफाई, अंबरनाथमध्ये श्वास गुदमरुन तिघा कामगारांचा मृत्यू
अंबरनाथमध्ये टाकी साफ करताना तिघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 12:20 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तिघा कामगारांचा मृत्यू झाला. टाकीत असलेल्या गॅसमुळे गुदमरुन कामगारांचा मृत्यू झाला. अंबरनाथ पश्चिमेला आयटीआय जवळील कंपनीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Ambernath Three workers died suffocating while Cleaning underground tank)

कलरच्या कामासाठी बोलावून तिघा कामगारांना केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवल्याचा आरोप केला जात आहे. नाका-तोंडाला बांधण्यासाठी विशेष मास्क दिले नव्हते, तर कपडाच बांधला, असंही एका कामगाराने सांगितलं. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कामगरा सफाईसाठी उतरले. तर एकाची तब्येत बिघडल्यामुळे तो औषध आणण्यासाठी दवाखान्यात गेला. मात्र याच वेळी तिघे कामगार टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती त्याला मिळाली.

ठेकेदारावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप

या घटनेत हर्षद, बिंदेश आणि दिनेश या तीन कामगारांना प्राण गमवावे लागले. हे सर्व जण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा बळी गेल्याचं बोललं जात आहे. साई नावाच्या ठेकेदाराने आपल्याला काम दिल्याचं एका कामगाराने सांगितलं. तिघा मयत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

नालासोपाऱ्यातील मजुरांच्या मृत्यूच्या आठवणी ताज्या

यापूर्वी नालासोपारा पश्चिम येथे एका इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन तिघा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबर 2019 मध्ये समोर आली होती. त्याच दिवशी नालासापोरा अन्य ठिकाणी असलेल्या नाल्यात दोघा जणांचे मृतदेहही सापडले होते. नालासोपाऱ्यात 12 तासात एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. (Ambernath Three workers died suffocating while Cleaning underground tank)

नेमकं काय झालं होतं?

नालासोपारा पश्चिममधील कारशेड समोर विनय कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आनंद व्ह्यूव या इमारतीच्या सेप्टीक टँक सफाईसाठी रात्री 6 मजूर काम करत होते. त्यातील एक मजूर सेप्टीक टँकमध्ये उतरल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो टाकीतच बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दोन मजूर गेले. मात्र, टँकमध्ये विषारी गॅसचे प्रमाण एवढे होते की या तिन्ही मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.

गोवंडीतही टँकमध्ये गुदमरुन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गोवंडीतील इमारतीमधील सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. गोवंडीतल्या गणेश वाडी परिसरातील मोरया ही धक्कादायक घटना घडली होती. मृत्यू झालेले तिन्ही कर्मचारी हे खाजगी कामगार होते, तर संबंधित इमारत एसआरएची होती.

संबंधित बातम्या :

गोवंडीत सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू

(Ambernath Three workers died suffocating while Cleaning underground tank)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.