कंपनीतील अमोनियम वायू गळतीमुळे 140 महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम, डोळ्यांची जळजळ, उलट्या आणि पडू लागल्या बेशुद्ध
त्याचा परिणाम जवळच युनिट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला. या वायू गळतीमुळे प्रभावित झालेल्या १४० कर्मचाऱ्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या वायू गळतीची चौकशी आता आंध्रप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येते आहे.
विशाखापट्टणम- एका कंपनीतील अमेनियम वायू गळतीमुळे (Ammonium gas leak)सुमारे 140 महिला कर्मचारी (140 female employees)आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाखापट्टणमच्या (Vishakhapatnam, Andhra Pradesh)अच्युतपुरममधील पोरस लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही वायू गळती झाली असण्याची शक्यता आहे. या वायूगळतीमुळे सगळ्या महिला कर्चमाऱ्यांना डोळ्यांच्या जळजळीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा या महिलांना सेझमध्ये असलेल्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांची परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवीतहानी अद्याप झालेली नाही.
Andhra Pradesh | Around 30 women workers fell sick after a gas leaked from Porus laboratories Pvt Ltd company in Atchutapuram, Visakhapatnam. At present all workers’ health is stable, no casualties reported. We’re carrying out the investigation: SP Gowthami Sali pic.twitter.com/3dioEToaMY
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 3, 2022
वायू गळती का झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापूरम येथील आंध्र प्रदेश इंटस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सेझच्या बाहेर असलेल्या पोरस लॅबमधून ही वायू गळती झाली असल्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जवळच युनिट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला. या वायू गळतीमुळे प्रभावित झालेल्या १४० कर्मचाऱ्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या वायू गळतीची चौकशी आता आंध्रप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येते आहे.
एप्रिलमध्येही आगीत सहा जणांचा मृत्यू
ही वायू गळतीच्या घटनेपूर्वी एप्रिल २०२२ मध्ये याच पोरस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आग लागल्याने ६ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आज दुपारी ही वायू गळतीची घटना घडली आहे. परिसरातील कंपन्यांच्या व्यतिरिक्त दोन इतर कंपन्यातील मजुरांनीही उलट्या होत असल्याची तक्रार केली आहे. आजारी पडणारे याच परिसरात असलेल्या बैंडिक्स फॅक्टरीतील कर्मचारी आहेत. या दुर्घटनेत आजारी पडलेल्यांना अच्युतापूरमच्या दोन खासगी हॉस्पिटल्समध्ये आणि अनाकापल्ले येथील एनटीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.