Amravati Accident : लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटी, एकाचा जागीच मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी

धारणी मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या राणीगाव येथून आज सायंकाळी 407 क्रमांकाचे सीजी 15 एसी 0116 हे वाहन मध्य प्रदेशच्या दिशेने जात होते. याच वाहनाला हा भीषण अपघात होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात सध्या शोककूल वातावरण आहे.

Amravati Accident : लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटी, एकाचा जागीच मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी
लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटी, एकाचा जागीच मृत्यू तर काहीजण गंभीर जखमीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 9:42 PM

अमरावती : गेल्या काही दिवसांत अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे. आजही असाच एक अपघात घडलाय. ज्यात पुन्हा एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मेळघाटातील (Melghat) राणीगाव येथून मध्यप्रदेशकडे लग्नाची वरात घेऊन जाणारे 407 ट्रक वाहन राणीगाव घाटात उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने या परिसरात सध्या खळबळ माजली आहे. या अपघातात 407 मध्ये बसलेले 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. धारणी मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या राणीगाव येथून आज सायंकाळी 407 क्रमांकाचे सीजी 15 एसी 0116 हे वाहन मध्य प्रदेशच्या दिशेने जात होते. याच वाहनाला हा भीषण अपघात होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात सध्या शोककूल वातावरण आहे.

कसा घडला हा अपघात?

घाटाचे रस्ते अनेकदा अत्यंत जाचक आणि जीवघेणे ठरत असतात. तसाच काहीसा प्रकार आजही समोर आला आहे. घाटात जाताना वाहन पलटी झाल्याने हा भयंकर अपघात घडला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कारण यात 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हच नाही तर याच अपघातात सुमारे 7 ते 8 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारा साठी रुग्णालयात पाठवले असल्याचीही माहिती समोर आली आहे. सायंकाळपर्यंत आरोग्यवाहनात जखमीना उपकेंद्राकडे पाठविणे सुरूच होते. काण या भागातील रस्ते खराब असल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणेही कठीण होऊन बसले होते. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

रस्ते खरब असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले

मेळघाट या भागात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या भागात मदत पोहोचवणेही तात्काळ शक्य होत नाही. त्यामुळे हे अनेकांच्या जीवावर बेतताना दिसून येत आहे. असे काही अपघात आधीही या भागात घडले आहेत. त्यामुळे या भागातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणीही स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच घाटातील रस्त्यावर वाहन जपून न चालवल्यास किती विपरीत परिणाम घडू शकतो हेही पुन्हा एकादा या घटनेने अधोरेखित केले आहे. त्यामुळे घाटातील रस्त्यावर वाहनावर चालकांचे योग्य नियंत्रण असणे गरजेचे असते तरच असे प्रकार टाळता येतात. आता या घटनेने मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.