Amravati Accident : अमरावतीमध्ये भीषण अपघातात 6 ठार! परतवाडा-बहिरम मार्गावर इनोव्हा आणि दुचाकीची जोरदार धडक

Amravati Road Accident News : या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा जीव गेलाय.

Amravati Accident : अमरावतीमध्ये भीषण अपघातात 6 ठार! परतवाडा-बहिरम मार्गावर इनोव्हा आणि दुचाकीची जोरदार धडक
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 10:35 AM

अमरावती : अमरावती (Amravati Accident News) जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर रात्री भीषण अपघात (Innova Car Accident News) झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा जीव गेलाय. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दुचाकी आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला होता. इनोव्हा कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम येथील तिघांचा तर बोधड येथील तिघांना मृत्यू झाला आहे. भीषण अपघातामध्ये (Amravati Road Accident) सहा जण ठार झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. हा अपघात इतका भीषण होता की या मध्ये इनोव्हा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीतच अडकून पडले होते. या अपघातानंतर परतवाडा बहिरम मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली होती. अखेर अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. या अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य केलंय. सध्या या अपघातामधील एका जखमीवर उपचार सुरु आहेत.

शिरजगाव पोलीस स्टेशन येथील रात्रगस्त अंमलदार हे रात्री गस्तीवर असताना त्यांना रोडवरील पुलाजवळ मोटरसायकलची सीट पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले. अपघातातील जखमी व मृतक हे वाहनात फसलेले होते. त्यांना वाहनाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आले.

नेमकं काय घडलं?

दोघे जण बाईकवरुन गावी जायला निघाले होते. त्यावेळी भरधाव इनोव्हा कारने मागून या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण पुलावरुन थेट खाली फेकला गेला. या तरुणाचा जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इनोव्हा कार चालकाचंही नियंत्रण सुटलं आणि इनोव्हाही अपघातग्रस्त झाली. या अपघातात इनोव्हा गाडी चक्काचूर झाली असून फोटोवरुन हा अपघात किती भीषण होता याची कल्पना करता येऊ शकेल.

हे सुद्धा वाचा

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या अपघातानंतर लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं असून पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे.

अपघातातील जखमी आणि मृतांची नावं

  • जखमी – संजय गजानन गायन वय 22 रा बोदड ता चांदूर बाजार

मृत्यू झालेल्यांची नावे –

  • 1. पांडुरंग रघुनाथ शनवारे वय 30 रा. बोदड ता चांदूर बाजार
  • 2. सतीश सुखदेव शनवारे वय 30 रा. बहिरम कारंजा
  • 3.सुरेश विठ्ठल निर्मळे वय 25 रा. खरपी.
  • 4. रमेश धुर्वे, Innova चालक वय 30 रा. सालेपूर
  • 5. MH-27-S-4670 होंडा स्प्लेंडर चा चालक : नाव प्रतीक दिनेशराव मांडवकर वय 26
  • 6 अक्षय सुभाष देशकर, वय 26 रा बोदड ता चांदूर बाजार
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.